फोटो सौजन्य - बीसीसीआय वूमन सोशल मिडिया
IND W vs SA W: महिला क्रिकेट खेळाडू सध्या महिला प्रिमियर लीग खेळण्यामध्ये व्यस्त आहेत. सध्या या लीगमध्ये खेळाडूंचा दमदार फार्म पाहायला मिळत आहे. भारताच्या महिला खेळाडू डब्ल्यूपीएलआधी श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळली आणि ती मालिका संघाने एकतर्फी नावावर केली. तर आता डब्ल्यूपीएल झाल्यानंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने आणखी एकदा मालिकेची घोषणा केली आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी तयारी करत आहे. आयसीसीचा हा मेगा कार्यक्रम जूनमध्ये इंग्लंडमध्ये खेळला जाईल. ही मेगा स्पर्धा १२ जूनपासून सुरू होईल. यासाठी तयारी करण्यासाठी टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने आता या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीसाठी, टीम इंडिया १७ एप्रिलपासून डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. याआधी दोन्ही संघ २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. आता दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील, जिथे दक्षिण आफ्रिका त्यांच्या पराभवाचा बदला घेईल. टीम इंडियाच्या खेळाडू सध्या महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये खेळत आहेत.
यापूर्वी, संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळली होती. २०२६ च्या महिला प्रीमियर लीगनंतर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळेल. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्धही खेळणार आहे. त्यामुळे, टीम इंडिया या आयसीसी स्पर्धेच्या तयारीत कोणतीही कसर सोडत नाही.
Mark your calendars 🗓️ A look at #TeamIndia‘s fixtures for the T20I series against South Africa scheduled to take place in April 🙌#SAvIND pic.twitter.com/Y4tBE2F04X — BCCI Women (@BCCIWomen) January 20, 2026
| तारिख | सामने | वेळ | शहर |
|---|---|---|---|
| 17 एप्रिल 2026 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना | 9.30 PM | डर्बन |
| 19 एप्रिल 2026 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना | 9.30 PM | डर्बन |
| 22 एप्रिल 2026 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना | 9.30 PM | जोहान्सबर्ग |
| 25 एप्रिल 2026 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा सामना | 9.30 PM | जोहान्सबर्ग |
| 27 एप्रिल 2026 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा सामना | 9.30 PM | बेनोनी |






