
यजमान बांग्लादेश मध्ये सुरु असलेल्या टी २० महिला आशिया चषक स्पर्धेचा आज अंतिम सामना रंगणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी हा अंतिम सामना रंगणार असून दुपारी सुमारे १ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत(Women Asia Cup 2022) सातवे अजिंक्यपद मिळवण्यास सज्ज झाल्या आहेत.
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या संघातील हुकमी फलंदाजांनी फारशा धावा केलेल्या नाहीत मात्र तरी संघातील नवोदित खेळाडूंनी ही जबाबदारी पार पाडत भारताचे वर्चस्व कायम ठेवले आहे. अंतिम सामन्यात भारताचा संघ श्रीलंकेपेक्षा वरचढ आहे. त्यांच्या ओशादी रनसिंघे हिलाच १०० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने धावा करता आल्या आहेत. सिल्हेट स्टेडियमवर महिला आशिया चषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
The Final Is Here! ? Drop your messages in the comments below & wish #TeamIndia as they face Sri Lanka in the #AsiaCup2022 summit clash. ? ?#INDvSL pic.twitter.com/VW2AmSGNZ3 — BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
Final Ready! ? ? Ahead of the #AsiaCup2022 summit clash, #TeamIndia Captain @ImHarmanpreet highlights what has been a highlight of India's campaign. ? ?#INDvSL pic.twitter.com/ryV9cEwTXS — BCCI Women (@BCCIWomen) October 14, 2022