भारत विरुद्ध बांग्लादेश सामना (फोटो- ट्विटर)
भारताची फलंदाजी
बांग्लादेशने भारताला प्रथम फलंदाजी करून 137 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने सुरुवात केली. स्मृती मंधाना केवळ 8 रन्सवर आउट झाली. भारताने पॉवर प्लेमध्ये 1 विकेट गमावून 63 रन्स केल्या. तर शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर यास्तिका भाटीया खेळण्यासाठी आले. शेफाली वर्मा 53 रन्स करून आउट झाली.
IND W Vs BAN Live: राधा यादव अन् रेणुकाने बांग्लादेशला लोळवले; भारताला विजयासाठी 137 रन्सची गरज
बांग्लादेशची गोलंदाजी
बांग्लादेशने चांगली गोलंदाजी केली. टार्गेट कमी असल्याने त्यांना भारताला रोखण्यात अपयश आले. पॉवर प्लेमध्ये बांग्लादेशला एक विकेट मिळाली. मारुफा अख्तरने स्मृती मंधानाला आउट केले. नाहिदा अख्तरने शेफाली वर्माची विकेट घेतली.
Successful powerplay in the chase 👌 Shafali Verma on the move 🔛#TeamIndia need 74 runs from 84 deliveries Updates ▶️ https://t.co/mWgNXcEkp0#T20WorldCup | #WomenInBlue | #INDvBAN pic.twitter.com/w7kRvEyx7s — BCCI Women (@BCCIWomen) June 25, 2026
बांग्लादेशची फलंदाजी
टॉस जिंकून प्रथम बांग्लादेशने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बांग्लादेशकडून दिलारा अख्तर आणि जुवैरिया फिरदौस यांनी सुरुवात केली. दोघांनी सुरुवात चांगली करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र दिलारा अख्तर केवळ 4 रन्स करून आउट झाली. तर जुवैरिया फिरदौस ही 33 रन्स करून आउट झाली. शोभाना मोस्तारी आणि कर्णधार निगर सुलताना यांनी बांग्लादेशचा डाव सावरला. निगर सुलताना 32 रन्स करून आउट झाली. तर शोभाना मोस्तारी 22 रन्स वर आउट झाली.
भारताची गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 10 ओव्हर्समध्ये बांग्लादेशला दोन मोठे धक्के दिले. पहिली ओव्हर शेफाली शर्माने टाकली. पहिल्याच ओव्हरपासून भारताने पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिलाच सामना खेळणाऱ्या रेणुका सिंग ठाकूरने दिलारा अख्तरची विकेट पटकावली. तर नंदिनी शर्माने जुवैरिया फिरदौसला आउट केले. राधा यादवने आज शानदार गोलंदाजी केली. राधा यादवने शोभाना मोस्तारी आणि कर्णधार निगर सुलतानाला आउट केले. रेणुका सिंग ठाकूरने देखील अचूक मारा केला. मात्र भारताचे क्षेत्ररक्षण अत्यंत सुमार दर्जाचे पाहायला मिळाले. फील्डर्सने अनेक कॅच सोडल्यामुळे काही रन्सचा फायदा बांग्लादेशला झाला. श्री चरणीने देखील शेवटच्या ओव्हर्समध्ये विकेट घेतल्या.
भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीकीपर), यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा.
बांग्लादेशचा संघ: जुआयरिया फिरदौस, दिलारा अख्तर, शर्मिन अख्तर, निगार सुलताना,शोभना मोस्तारी, शॉर्ना अख्तर, रितू मोनी, राबेया खातून, नाहिदा अख्तर, मारुफा अख्तर, संजिदा अख्तर मेगला.






