फोटो सौजन्य - Chess Base India सोशल मीडिया
चेस ऑलिम्पियाड २०२४ : चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये भारताचे महिला आणि पुरुष संघ कमालीची कामगिरी करत आहेत. काल टीम इंडियाचा दहावा राऊंड पार पडला. यामध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना युएसए विरुद्ध सामना झाला. यामध्ये भारताच्या पुरुष संघाने अविश्वसनीय कामगिरी करत २.५-१.५ ने खेळ भारताच्या नावावर केला. कालच्या सामन्यामध्ये डी गुकेशने त्याचा सामना जिंकला त्यानंतर विधित गुजराथीने त्याची मॅच ड्रॉ केली, तर प्रज्ञानंदाला सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर शेवटचा सामना अर्जुन एरिगासिने मजबूत खेळ दाखवत सामना नावावर केला अशा प्रकारे भारताच्या पुरुष संघाने दहाव्या राउंडमध्ये सामना जिंकला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे, आजच्या सामन्यामध्ये काय निकाल येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर भारतीय महिला संघाचा सामना चीन विरुद्ध झाला. हा सामना भारतीय महिला संघाने २.५-१.५ ने भारताच्या नावावर केला. यामध्ये हरिका, वैशाली आणि वांतिका अगरवाल यांना ड्रॉ चा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघाला समान गुण देण्यात आले होते. दिव्या देशमुखने दमदार खेळ दाखवून विरोधकाला पराभूत करून सामना जिंकला. आज चेस ऑलिम्पियाड २०२४ चा राऊंड ११ होणार आहे. त्यामुळे भारताच्या दोन्ही संघ आज विजयी झाल्यास सुवर्ण पदक नावावर करणार आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यावर चेस प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत.
The results of Team India in the 10th and penultimate round of the Chess Olympiad 2024! Team India (Open) defeated USA by 2.5-1.5, and Team India (Women) defeated China today also by 2.5-1.5.
Team India (Open) will face Slovenia in the final round tomorrow, while Team India… pic.twitter.com/UfatgjTeca
— ChessBase India (@ChessbaseIndia) September 21, 2024