संजय राऊत यांच्या जीवाला धोका (फोटो- सोशल मीडिया)
बॉम्ब से उडा दूंगा अशा स्टीकरमधून देण्यात आली धमकी
बॉम्ब शोध पथक राऊतांच्या घरी दाखल
घर आणि आजूबाजूच्या परिसरात कसून तपासणी
मुंबई: सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. 15 तारखेला मतदान तर 16 ला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधु एकत्रित आले आहेत. ठाकरे बंधु यांना एकत्रित आणण्यासाठी संजय राऊत यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोध पथक दाखल झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोध पथक दाखल झाले आहे. त्यांच्या घराची व आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई पोलिसांचे पथक देखील दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्या घरासमोर ‘बॉम्ब से उडा दूंगा’ असे स्टीकर लावलेली गाडी आढळून आली आहे. त्यामुळे याचा तपास वेगाने केला जात आहे.






