2025 वर्षातील सर्वोत्तम कसोटी प्लेइंग 11 जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
The best Test playing 11 of 2025 : २०२५ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये अनेक घटना घडल्या आहेत. या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंनी विक्रम रचले आणि मोडले आहेत. विविध देशांमध्ये खेळल्या गेलेल्या सामने रोमहर्षक झाले आहेत. यामुळे कसोटी क्रिकेटचा दर्जा उंचावला नाही तर अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीला नवीन दिशा देखील मिळाली आहे. दरम्यान, वर्ष संपण्यापूर्वी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम खेळाडू संघ जाहीर केल आहे. यादीत तीन भारतीयांचा समावेश केला गेला आहे. संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमा यांच्याकडे दिले गेले आहे.
हेही वाचा : टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला मोठा झटका! स्टार खेळाडू वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त
२०२५ या वर्षात कसोटी क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले आहे. दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून त्यांचे पहिले विजेतेपद पटकावले आमी ऑस्ट्रेलियाला सलग दुसरे विजेतेपद जिंकण्यापासून रोखले. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेवर कब्जा केला. तर भारतीय संघाचा इंग्लंडमधील कसोटी मालिका अनिर्णित आणि दक्षिण आफ्रिकेचा भारतात कसोटी मालिका विजय देखील चर्चेत राहिला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या २०२५ च्या सर्वोत्तम कसोटी संघात तीन भारतीय (केएल राहुल, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह), चार ऑस्ट्रेलियन (ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड), दोन इंग्लिश खेळाडू (बेन स्टोक्स आणि जो रूट) आणि एक दक्षिण आफ्रिकन (सायमन हार्मर) यांचा समावेश आहे. अनुभवी भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाचा १२ वा खेळाडू म्हणून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
ट्रॅव्हिस हेड आणि केएल राहुलचा सलामीवीर म्हणून संघात असणार आहेत. तर जो रूट तिसऱ्या क्रमांकावर दिसणार आहे आणि शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर आहे. कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेला टेम्बा बावुमा पाचव्या क्रमांकावर असेल. बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून २०२५ ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने भारतात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देखील दिला.
हेही वाचा : IND W vs SL W : दीप्ती शर्माने गाजवले 2025 हे वर्ष! ‘या’ विक्रमासह प्रस्थापित केला खास दबदबा
यष्टीरक्षक म्हणून काम करणारा अॅलेक्स कॅरीला सहाव्या क्रमांकावर पसंती देण्यात आली आहे. बेन स्टोक्स सातव्या क्रमांकावर आणि मिशेल स्टार्क आठव्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह नवव्या क्रमांकावर आहे आणि स्कॉट बोलँड दहाव्या क्रमांकावर असेल आहे. सिमरन हार्मर अकरा क्रमांकावर आहे. हार्मर हा संघातील एकमेव फिरकीपटू आहे.






