पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या पाचव्या दिवशी दमदार कामगिरी केली आहे. यामध्ये भारताच्या पॅरा ॲथलेटिक्सनी अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली आहे. काल भारताच्या खात्यात आठ मेडलची कमाई झाली आहे. यामध्ये २ सुवर्ण, ३ रौम्य आणि ३ कास्यपदकांचा समावेश आहे. यामध्ये भारताच्या पॅरा शटलरने दमदार कामगिरी केली काल भारताच्या पॅरा शटलरने ५ मेडल नावावर केले आहेत, यामध्ये नितेश कुमारने गोल्ड मेडल, सुहास यथिराज सिल्वर मेडल, तुलसीमथी मुरुगेसन सिल्वर मेडल, मनीषा रामदास कांस्यपदक आणि नित्या श्री सिवनने कांस्यपदक नावावर केले आहे. यामध्ये भारताच्या सर्व पॅरा शटलरने कशाप्रकारे कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
भारताच्या पॅरा बॅडमिंटनपटूंनी दमदार कामगिरी करत पाच मेडल नावावर केले आहेत. फोटो सौजन्य - The Khel India/The Hindu/पॅरिस पॅरालिम्पिक युट्युब
पॅरालिम्पिक चॅम्पियन आणि भारताचा स्टार पॅरा शटलर नितेश कुमारने काल दमदार कामगिरी केली आहे, त्याने ग्रेट ब्रिटनच्या शटलरला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरल आहे. फोटो सौजन्य - The Khel India/The Hindu
भारताची पॅरा शटलर नित्या श्री सिवनचं मिक्स टीममध्ये मेडल हुकलं, पण वैयक्तिक स्पर्धेमध्ये तिने इंडोनेशियाच्या शटलरला सलग गेममध्ये पराभूत करून सामना जिंकला आणि कांस्यपदकावर नाव कोरलं. फोटो सौजन्य - पॅरिस पॅरालिम्पिक युट्युब
वर्ल्ड नंबर एक आणि भारताची पॅरा शटलर तुलसीमथी मुरुगेसन हिला ऑलिम्पिक चॅम्पियन यांग क्विक्सियाच्या विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
वर्ल्ड नंबर दोन आणि भारताची पॅरा शटलर मनिषा रामदासने डेन्मार्कच्या पॅरा शटलरचा २१-१२ आणि २१-८ असा पराभव करून कांस्यपदक नावावर केलं आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये सिल्वर मेडल विजेता सुहास यथिराजने पुन्हा एकदा सिल्वर मेडलवर कब्जा केला आहे. त्याला फायनलच्या सामन्यामध्ये फ्रान्सच्या शटलरकडून पराभवाचा सामना करावा लागला. फोटो सौजन्य - First post