IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या खेळाडूंना संधि देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. जर तुम्हीही प्लेइंग इलेव्हनवर नजर ठेवून असाल तर माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सामन्यापूर्वी संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. परंतु अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन यांना वगळण्यात आले आहे.
हेही वाचा : IND vs SA : पहिल्या टी२० मध्ये हार्दिक पांड्याला खुणावतेय विक्रमी ‘शतक’! दोन विकेट टिपताच रचेल इतिहास
स्टार स्पोर्ट्सच्या “गेम प्लॅन” शोमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान, पार्थिव पटेलने तेचे मत मांडले आहे. त्याने जितेशला यष्टीरक्षक म्हणून संघात कायम ठेवत तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळायला पाहायचे असल्याचे सांगितले आहे.
पार्थिव पटेल म्हणाला की, “मला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर डावखुरा (तिळक वर्मा) आणि उजव्या हाताचा (सूर्यकुमार यादव) भारतीय बघायला आवडेल. तसेच पाचव्या क्रमांकावर शिवम दुबे आहे. फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत आहे की नाही यावर ते अवलंबून असणार आहे. भारत त्याचा अशा प्रकारे संघात वापर करत आहे. जर तुम्ही संघाकडे बघितले तर जितेशकडे सामने पूर्ण करण्याची चांगली क्षमता आहे. म्हणूनच जितेश माझा यष्टिरक्षक असणार आहे.”
माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेल पुढे म्हणाला की, “अर्शदीप सिंगला स्थान दिलेले नाही. जेव्हा तुम्ही भारतीय परिस्थितीत खेळता तेव्हा तुम्हाला समान प्लेइंग इलेव्हन दिसत असते. आशिया कप जिंकण्याची भारताची योजना फिरकीवर आधारलेली होती. तुम्हाला येथेही अशाच खेळपट्ट्या दिसण्याची शक्यता आहे. जिथे तुमच्याकडे फिरकीपटू म्हणून वरुण, अक्षर आणि कुलदीप असणार आहे.”
अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.






