स्टीव्ह स्मिथ(फोटो-सोशल मीडिया)
Steve Smith’s commentary on Nathan Lyon : ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस कसोटी मालिकेतील दूसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने इंग्लंडचा पराभव केला आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या या दिवस-रात्र कसोटीत सामन्यात नॅथन लिऑनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यावरून निर्माण झालेला वाद ऑस्ट्रेलियाचा कार्यवाहक कर्णधार स्टीव्ह स्मिथने शांत करण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला की, फलंदाजीचा क्रम मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : IND vs SA : पहिल्या टी२० मध्ये हार्दिक पांड्याला खुणावतेय विक्रमी ‘शतक’! दोन विकेट टिपताच रचेल इतिहास
फिरकी गोलंदाजाविरुद्ध कोणतीही वैयक्तिक तक्रार नाही. १३ वर्षांत पहिल्यांदाच लिऑनला होम टेस्ट मॅचमधून वगळण्यात आले. नंतर फिरकी गोलंदाजाने सांगितले की तो खूप वाईट मूडमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी म्हटले होते की, लिऑनला फक्त या मॅचसाठी वगळण्यात आले आहे.
त्यांनी ३८ वर्षीय फिरकी गोलंदाजाला अॅडलेडमधील तिसऱ्या टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची हमी दिली होती. सामन्यानंतर स्मिथने सांगितले की, लिऑनविरुद्ध कोणतीही वैयक्तिक तक्रार नाही. तो अनेक वर्षांपासून आमचा मुख्य फिरकी गोलंदाज आहे, परंतु फलंदाजी मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या टेलएंडर्सनी जवळजवळ ५० षटके ज्या पद्धतीने खेळली त्यामुळे आम्हाला अपेक्षित असलेला तोल मिळाला.
ऑस्ट्रेलियाने रविवारी ब्रिस्बेन कसोटीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा आठ विकेट्सनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या टेलएंडर्समध्ये, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ७७ धावा केल्या, तर मायकेल नेसर (१६) आणि ब्रेंडन डॉगेट (१३) यांनीही चांगले योगदान दिले.






