हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya will reach a century of wickets : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका आजपासून खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज, ९ डिसेंबरला कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात एक मोठा विक्रम गाठू शकतो. या सामन्यात जर त्याने दोन विकेट्स घेतल्या तर पंड्या टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याची किमया साधणार आहे.
हार्दिक पंड्याला टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स परून करण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज आहे. या सामन्यात दोन विकेट्स घेताच तो टी-२० मध्ये शतक पूर्ण करू शकेल. कटक टी-२० मध्ये आशिया कपनंतर हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने १२० सामन्यांमध्ये १०८ डावांमध्ये ९८ विकेट्स मिळवल्या आहेत. जर त्याने आणखी दोन विकेट्स घेतल्या तर पंड्या सर्वात लहान स्वरूपात १०० विकेट्सचा आकडा
पंड्यासह या सामन्यात एक विकेट घेऊन जसप्रीत बुमराह देखील त्याचे टी-२० क्रिकेटमध्ये विकेटचे शतक पूर्ण करणार आहे. बुमराहने आतापर्यंत भारतासाठी ८० टी-२० सामन्यांच्या ७७ डावात ९९ विकेट चटकावल्या आहेत. कटक टी-२० मध्ये आणखी एक विकेट घेतल्याने त्याच्या १०० विकेट पूर्ण होतील.
भारतासाठी फक्त अर्शदीप सिंग या एकमेव गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी टिपले आहेत. हा टप्पा गाठणारा तो सर्वात जलद गोलंदाज देखील बनला आहे. अर्शदीप सिंगने ६८ सामन्यांमध्ये १०५ बळी घेण्याची किमया साधली आहे. या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. यानंतर हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
युजवेंद्र चहल हा टी-२० स्वरूपात भारताचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने ८० सामन्यांमध्ये ९६ बळी मिळवले आहेत. २०२३ पासून तो एकही टी-२० आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही. भुवनेश्वर कुमार हा टी-२० मध्ये भारताचा पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ज्याने ८७ सामन्यांमध्ये ९० बळी घेण्याची किमया साधली आहे. भुवनेश्वर कुमारने २०२२ पासून एक देखील टी-२० सामना खेळलेला नाही.
भारत T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सनदार.
दक्षिण आफ्रिका T20 संघ : एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅन्सन, क्विंटन डी कॉक, डोनोव्हान फरेरा, ॲनरिक नॉर्टजे.






