आयपीएल ट्रॉफी(फोटो-सोशल मीडिया)
IPL २०२५ : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, उर्वरित आयपीएल २०२५ हे १७ मे पासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. बीसीसीआयनकडून याबाबत फ्रँचायझींना मोठी सूट देण्यात आली आहे. स्पर्धेत कोणतीही अडचण येऊ उभी राहू नये आणि सर्व संघांना पूर्ण ताकद मिळावी यासाठी बीसीसीआयने संघांना नवीन खेळाडू जोडण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.
बीसीसीआयच्या या बदलानंतर, सर्व संघ पूर्वीसारखेच मजबूत दिसून येणार आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर, आता संघांमध्ये त्या परदेशी खेळाडूंऐवजी नवीन खेळाडूंचा समावेश केला जाणार आहे. दुखापत, आजारपण, वैयक्तिक कारणांमुळे किंवा राष्ट्रीय प्रतिबद्धतेमुळे आयपीएलच्या अंतिम टप्प्यात सहभागी होऊ न शकलेले खेळाडू.
बीसीसीआयकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, यावेळी सामील होणारे खेळाडू २०२६ च्या लिलावापूर्वी राखण्यास पात्र ठरणार नाहीत आणि तसेच त्यांना पुढील लिलावासाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. आता ज्या आयपीएल संघांमध्ये खेळाडूंचा समावेश असेल त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर बोली लावली जाईल.असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे आणि स्पर्धेत व्यत्यय आला तरी संघांना स्पर्धात्मक ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीच्या नियमांनुसार, फ्रँचायझी त्यांच्या १२ व्या लीग सामन्यापर्यंतच जखमी किंवा आजारी खेळाडूंसाठी बदली खेळाडू करारबद्ध करू शकत होत्या. पण यावेळी स्पर्धा मध्येच पुढे ढकलल्यामुळे आणि खेळाडूंची अनुपलब्धता वाढल्यामुळे हा नियम बदलण्यात आला आहे. असे म्हटले आहे.
आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू होण्यापूर्वी करारबद्ध करण्यात आलेले खेळाडू, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सेदिकुल्लाह अटल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मयंक अग्रवाल आणि राजस्थान रॉयल्सचे लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि नांद्रे बर्गर, अजूनही संघात कायम राहण्यास पात्र असणार आहेत. लीगची पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता राखण्यासाठी बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संघांना लवचिकता मिळणार आहे, परंतु लिलाव प्रक्रियेची निष्पक्षता देखील राखली जाणार आहे.