जोस बटलर(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल एक आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. आता पुन्हा आयपीएल १७ मे पासून सुरू होणार आहे. या दरम्यान अनेक परदेशी खेळाडू पुन्हा आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संघांची चिंता वाढली आहे. विशेषतः जे संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत, ज्यामध्ये पहिले नाव गुजरात टायटन्स या संघाचे येते. हा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मात्र, आता या संघासाठी एक आनंदाची बातमी आहे.
गुजरात टायटन्सचा सर्वात महत्वाचा खेळाडू जोस बटलर हा आहे. जो संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतो. परंतु आता आयपीएलचे उर्वरित सामने बटलर खेळू शकणार नाही. कारण, २९ मे पासून घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची इंग्लंडच्या एकदिवसीय संघात निवड झाली आहे. या कारणास्तव, तो आता आयपीएल २०२५ च्या शेवटच्या टप्प्यात खेळताना दिसणार नाही.
हेही वाचा : CBSE Result : क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या Vaibhav Suryavanshi ला सीबीएसई परीक्षेत अपयश! वाचा सविस्तर..
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात बटलरचा फॉर्म जबरदस्त असा होता, त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ आयपीएल २०२५ सामन्यांमध्ये ५०० धावांचा पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत त्याची अनुपस्थिती संघासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. तथापि, गुजरातने त्याच्या जागी श्रीलंकेचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसला संघात समाविष्ट करण्याची योजना आखली असल्याची बातमी समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात टायटन्सचे संघ व्यवस्थापन बऱ्याच काळापासून कुसल मेंडिसच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होते. या काळात मेंडिस देखील त्याच्या कारकीर्दीतील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत, बटलरचा पर्याय म्हणून मेंडिस संघासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. असे मानले जाता आहे.
🚨 MENDIS IN FOR JOS BUTTLER. 🚨
– Kusal Mendis likely to replace Buttler in Gujarat Titans for IPL 2025 Playoffs. (Newswire). pic.twitter.com/TpIiUCJ4v6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 15, 2025
फ्रँचायझीकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेली नसली तरी, मेंडिसला संघात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. आयपीएल तांत्रिक समितीकडून परवानगी मिळाल्यानंतरच मेंडिस अधिकृतपणे संघात सामील होऊ शकेल. अशी माहिती मिळत आहे.
सद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. ज्याची झळ दोन्ही देशातील क्रीडा स्पर्धांना बसली आहे. अशातच पाकिस्तानमधून एक बातमी समोर आली आहे. ती बातमी पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू सोएब मलिकशी संबंधित आहे. या दिग्गज खेळाडू शोएब मलिकने नुकताच आपल्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, खरी बातमी अशी आहे की त्यांनी राजीनामा दिला नाही तर तो त्यांच्याकडून तो जबरदस्तीने घेण्यात आला आहे. अशी माहिती आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता त्यांच्या देशांतर्गत स्पर्धेतील चॅम्पियन्स कपच्या सर्व मार्गदर्शकांवर कारवाई करण्याच्या विचरात आहे. पीसीबी गेल्या वर्षी चॅम्पियन्स कप संघांसाठी नियुक्त केलेल्या सर्व ५ मार्गदर्शकांना काढून टाकणार असल्याची माहिती आहे. अशातच चॅम्पियन्स कप संघ स्टॅलियन्सचा मार्गदर्शक शोएब मलिक राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे.