IPL 2025 मध्ये KKR च्या संघामध्ये मोठा उलटफेर! या खेळाडूंचा होणार पत्ता कट?
कोलकाता नाईट रायडर्स : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये अनेक वाद पाहायला मिळाले होते. मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवल्यानंतर खेळाडूंमध्ये अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता पुढील वर्षी आयपीएल २०२५ मध्ये अनेक संघांमध्ये उलटफेर पाहायला मिळणार आहेत. याचे कारण म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये संघाना मर्यादित खेळाडूंचा रिटेन करता येणार आहे. आयपीएल २०२५ ची तयारी सुरू होणार आहे. या हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. सर्व संघ खेळाडूंची सुटका आणि कायम ठेवण्याची यादी जाहीर करतील. जर आपण कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोललो तर ते त्यांच्या अनेक खेळाडूंना सोडू शकतात.
कोलकाता कोणत्या खेळाडूंना सोडू शकतो या यादीत तीन खेळाडूंची नावे समाविष्ट केली जाऊ शकतात. मिचेल स्टार्क, फिलिप सॉल्ट आणि नितीश राणा यांना सोडले जाऊ शकते. गेल्या मोसमात स्टार्कला संघाने विकत घेतले होते आणि त्याला महागड्या किमतीत विकले गेले होते. पण आता ते सोडले जाऊ शकते. आयपीएल २०२४ च्या ऑक्शनमध्ये केकेआरने स्टार्कला २४.७५ कोटींना विकत घेतले होते. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर स्टार्कची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सनेही स्टार्कला विकत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पण गुजरातने २४.५० कोटींनंतर बोली लावली नाही. IPL २०२४ च्या १४ सामन्यात स्टार्कने १७ विकेट घेतल्या आहेत. परंतु त्याची किम्मत जास्त असल्यामुळे केकेआर त्याला सोडण्याचा निर्णय घेऊ शकते.
सोशल मीडियावर अनेक बातम्या आल्या होत्या की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार आहे. परंतु काही दिवसांपूर्वी रविचंद्रन अश्विनने त्याच्या युट्युब चॅनेलवर सांगितले की, रोहित शर्माला त्याची डोकेदुखी वाढवायची नाही त्यामुळे तो मुंबई इंडियन्सची साथ सोडणार नाही असे त्याने स्पष्ट केले होते. मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना सोडणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य असणार आहे.