फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
MI vs GT toss Update : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटल्स यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे कारण पहिल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरात टायटन्सचा पहिला सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध झाला होता, या सामन्यामध्ये पंजाब किंग्सने विजय मिळवून गुजरात टायटन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. तर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. त्यामुळे पॉईंट्स टेबलवर दोन्हीही संघ अजून दोन गुण मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.
आजच्या सामन्यांमध्ये स्पिनरला अहमदाबादच्या खेळपट्टीवर मदत मिळू शकते. तर आजच्या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल फिल्डिंग करणार हे मात्र पक्के होते. कारण त्यानंतर चेंडू जड होतो आणि फलंदाजी करण्यात अडचणी येतात. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या खेळताना दिसत आहे. एका सामन्याच्या बंदीमुळे तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच वेळी, शुभमन गिल गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे.
🚨 Toss 🚨@mipaltan won the toss and opted to bowl first against @gujarat_titans in Ahmedabad!
Updates ▶ https://t.co/lDF4SwmX6j#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/M5qAcHfJEZ
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
आयपीएलमध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ५ सामने झाले आहेत. यापैकी गुजरात टायटन्सने ३ वेळा, तर मुंबई इंडियन्सने २ वेळा सामना जिंकला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर मनगटाचा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने त्याच्या प्रतिभेने प्रभावित केले. पण त्याची खरी परीक्षा गुजरात टायटन्सविरुद्ध सोप्या फलंदाजीच्या खेळपट्टीवर असेल. गेल्या काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स, भारत आणि मुंबईसाठी सूर्यकुमार यादवची कामगिरी खराब राहिली आहे. त्याने १० सामन्यांमध्ये ११९ धावा केल्या. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ४८ धावा केल्या. त्याने सीएसकेविरुद्ध २६ चेंडूत २९ धावा केल्या. अहमदाबादमध्ये त्याला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी असेल.
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा