Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 :  Suryakumar Yadav ने केली ‘निवृत्ती’ ची पोस्ट, चाहत्यांना धक्का! सोशल मीडियावर उडाली खळबळ, पण सत्य…  

आयपीएलमध्ये ३० मे रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबईचा सामना गुजरात टायटन्ससोबत खेळवला जाणार आहे. या दरम्यान मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 29, 2025 | 10:41 AM
IPL 2025: Suryakumar Yadav posts 'retirement', shocks fans! Social media is in a frenzy, but the truth...

IPL 2025: Suryakumar Yadav posts 'retirement', shocks fans! Social media is in a frenzy, but the truth...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चे क्वालिफायर सामने आजपासून सुरू होणार आहेत. आज क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरुळू आमनेसामने असणार आहेत. तसेच  मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. ३० मे रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबईचा सामना गुजरात टायटन्ससोबत खेळवला जाणार आहे. परंतु, २८ मे रोजी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता.

आयपीएल २०२५ आतापर्यंत भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी खूपच चांगले राहिले आहे. त्याने मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये घेऊन जाण्यास  मोठी भूमिका वठवली आहे. त्याने लीग स्टेजच्या प्रत्येक सामन्यामध्ये धावा केल्या आहेत आणि संघाला सहाव्या जेतेपदाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. दरम्यान, त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत आणि निवृत्तीशी संबंधित कॅप्शन लिहिले आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.

हेही वाचा : PBKS vs RCB Qualifier 1 : आज पंजाब साधेल सरशी की बंगळुरू पडेल भारी? जाणून घ्या सामन्याची A टू Z माहिती..

परंतु, सत्य मात्र वेगळे आहे. सूर्यकुमार यादव कुठेच जाणार नाहीये. त्याने त्याच्या वडिलांच्या निवृत्तीवर एक पोस्ट केली आहे. सूर्यकुमार यादवचे वडील अशोक कुमार यादव नुकतेच  निवृत्त झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते बीएआरसीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून काम पाहत होते.

सूर्यकुमार यादवने या खास प्रसंगी त्याचे वडील आणि कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यावर एक एक भावनिक कॅप्शन देखील लिहिले आहे. सूर्याने लिहिले की, ‘माझा पहिला आणि नेहमीचा हिरो, आदर्श, जीवन पुस्तक आणि मार्गदर्शक. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इनिंग संपली आहे आता पुढच्या इनिंगसाठी तयार होण्याची वेळ आली आहे, बाबा. जी थोडी अधिक आरामदायी असणार आहे.’

सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ च्या ऑरेंज कॅप शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ७१.११ च्या सरासरीने आणि  १६७.९७ च्या स्ट्राइक रेटने ६४० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ५ अर्धशतके देखील आहेत.  मुंबई इंडियन्ससाठी एका हंगामात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.  विशेष म्हणजे त्याने प्रत्येक सामन्यात २५ किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत, जो एक जागतिक विक्रम ठरला आहे.

हेही वाचा : RCB Vs LSG : ‘उत्तम कामगिरी, Rishabh Pant च्या क्षमतेवर कधीच शंका नव्हती : Zaheer Khan चे पंतवर स्तुतिसुमने..

आज पहिला क्वालिफायर १ चा थरार

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला क्वालिफायर १ सामन्याचा थरार आज बघायाल मिळणार आहे. आज २९ मे रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही दोन संघ आमनेसामने असणार आहेत. जो कोणी हा सामना जिंकेल तो थेट आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. हा महत्त्वाचा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.

Web Title: Ipl 2025 suryakumar yadav posts retirement fans shocked but the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • mumbai indians
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

BCCI मध्ये सुद्धा सरकारी नोकरी आहेत का? Vacancy बाबत कसे समजणार? जाणून घ्या सर्वकाही
1

BCCI मध्ये सुद्धा सरकारी नोकरी आहेत का? Vacancy बाबत कसे समजणार? जाणून घ्या सर्वकाही

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  
2

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 
3

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 
4

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.