करुण नायर(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५५ सामने खेळवण्यात आले आहेत. ५५ वा सामना काल दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला होता. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघ हैदराबादविरुद्ध फक्त १३३ धावाच करू शकला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्याचे दिसून आले. आशुतोष शर्मा आणि स्टब्स वगळता इतर कुणालाही मोठी खेळी करण्यात यश आले नाही. हैद्राबादकडून कर्णधार पॅट कमीन्सने ३ विकेट्स घेऊन आपला दबदबा राखला.
दिल्लीकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेले नाही. फक्त ट्रिस्टन स्टब्स(३६ चेंडू ४१) आणि आशुतोष शर्मा(२६ चेंडू ४१) यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर एकाही फलंदाजाला २० धावा देखील करता आल्या नाहीत. हैदराबादच्या कर्णधाराने पहिल्याच चेंडूवर करुण नायरला माघारी पाठवले. यासह, करुण नायर आयपीएल २०२५ च्या पहिल्या डावानंतर सतत अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.
करुण नायरने आयपीएल २०२५ च्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करत ८९ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण, पुढच्या ६ सामन्यांमध्ये मात्र त्याची बॅट शांत दिसून आली. ६ सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त ६५ धावा आल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या या सामन्यात तो गोल्डन डकचा शिकार ठरला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास मजबूर केले.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ८९ धावांची खेळी करून त्याने खळबळ उडवून दिली होती. त्याची खेळी खूप स्फोटक होती.या खेळीनंतर करुण नायर ६ सामन्यांमध्ये सतत अपयशी ठरत आला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पुढच्या सामन्यात तो आपले खाते देखील उघडू शकला नाही. त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३१ धावांची छोटी खेळी खेळली पण जीटीविरुद्धच्या पुढच्या सामन्यात तो १५ धावांवर माघारी परतला. तर, तो आरसीबीविरुद्ध ४ धावा, केकेआरविरुद्ध १५ धावा आणि हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शून्य धावा काढून बाद झाला होता. नायरचा फॉर्म दिल्लीसाठी चिंतेसाठी विषय बनला आहे.