Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs KKR: कार्तिक त्यागी नावाचे वादळ, ईडन गार्डन्समध्ये कमाल; एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट्स, 155 धावांमध्ये RR ला रोखले

पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेत राजस्थान रॉयलने केवळ १५५ धावांचे लक्ष्य कोलकाता नाईट रायडर्ससमोर ठेवले आहे. वरूण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी या दोन झंझावातामुळे RR ची भंबेरी उडाली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 05:48 PM
कार्तिक त्यागीची कमाल खेळी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

कार्तिक त्यागीची कमाल खेळी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • कार्तिक त्यागीचे कमालीचे प्रदर्शन 
  • KKR vs RR मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट्स 
  • १५५ धावांवर राजस्थान रॉयल्सला रोखले
इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा २८ वा सामना आज, १९ एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात राजस्थानने ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. दरम्यान, कोलकाता संघ या हंगामात एकही विजय मिळवू शकलेला नाही. तर दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत.

आजच्या खेळामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी कमालीचा खेळ दाखवला असून राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना केवळ १५५ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे आणि यामध्ये वरूण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी या दोन्ही गोलंदाजांचा सर्वात मोठा वाटा आहे. कार्तिकने तर आपल्या गोलंदाजीने कमाल करत एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतल्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

राजस्थानची फळी ढेपाळली

राजस्थानला यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनीही चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र ४६ धावांवर वैभवला वरूण चक्रवर्तीने कॅच आऊट केल्यानंतर राजस्थानच्या संघाची वाताहत सुरू झाली आणि पुढची संपूर्ण फळी ढेपाळल्याचे दिसून आले. यामध्ये वरूण चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात ३ खेळाडू फसले असल्याचे दिसून आले. 

यावर कार्तिक त्यागीने चारचाँद लावले आणि १९ व्या षटकात त्याने लागोपाठ ३ विकेट्स घेत कोलकाता नाईट रायडर्सना चांगला ब्रेकथ्रू मिळवून दिला. कार्तिक त्यागीने धावांच्या वेगांवर रोख लावला. सहसा शेवटच्या षटकांमध्ये धावा अधिक घेतल्या जातात मात्र कार्तिक त्यागीच्या उत्तम गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सच्या खेळावर मात्र चाप बसला.

Toss Update RR vs KKR: राजस्थान रॉयल्सच्या बाजूने नाणेफेक, KKR ला देणार धावांचे लक्ष्य; पहिले करणार फलंदाजी

कार्तिक नावाचे तुफान 

आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सने एकही सामना जिंकलेला नाही. मात्र आज संघाने कमालीचा खेळ केला आहे आणि यामध्ये कार्तिक त्यागीचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले. १९ व्या ओव्हरमध्ये कार्तिकने ३ विकेट्स घेत संपूर्ण सामना फिरवला. केकेआरच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि राजस्थानच्या तोंडचे पाणी पळवले. 

राजस्थानच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचेही दिसून आले. डोनोव्हन फरेरा ७ धावांवर सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजाने ७ चेंडूंमध्ये ९ धावा केल्या. वैभव आणि यशस्वी सोडल्यास कोणताच खेळाडू छाप पाडू शकला नाही. 

KKR vs RR: वैभव सूर्यवंशी कोणता रेकॉर्ड तोडणार? 15 वर्षाच्या या खेळाडूची नजर इतिहास रचण्यावर

Web Title: Ipl 2026 kkr vs rr match kartik tyagi bring storm at eden gardens 3 wickets in a single over rr restricted to 155 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • KKR vs RR

संबंधित बातम्या

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
1

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming
2

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला
3

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ
4

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.