Lionel Messi : मेस्सीची जादू, इंटर मियामीचा न्यू इंग्लंडवर दणदणीत विजय, सौजन्य : आयएएनएस
लियोनल मेस्सी (Lionel Messi) ने एक सर्वोत्तम असिस्ट आणि सामन्याच्या अखेरच्या वेळी केलेल्या गोलच्या मदतीने इंटर मियामीला न्यू इंग्लंड रिव्हॅल्यूशनविरुद्ध 2-1 असा दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह पुढील वर्षी होणाऱ्या कॉन्काकॅफ चॅम्पियन्स फुटबॉल चषकात आपली जागा निश्चित केली आहे.
या विजयाने मियामी एमएलएस चषक प्लेऑफआधी ईस्टर्न कॉन्फ्रेंसमध्ये नंबर 2 सीडच्या स्थितीत पोहचला आहे. या हंगामात मेस्सीच्या नावे आतापर्यंत 26 गोल व 16 असिस्टची नोंद झाली आहे. असिस्ट म्हणजे आपल्या सहकार्याला गोल करताना मदत करणे होय. या सोबतच सलग तिसऱ्यांदा एमएलएस एमव्हीपी पुरस्कार आणि सलग दुसऱ्यांदा ‘गोल्डन बूट’ जिंकण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर पोहचला आहे.
पहिल्या 45 मिनिटापर्यंत दोन्ही संघामध्ये एक अटीतटीचा सामना पहायला मिळाला. हाफ टाईमपर्यंत कोणताही संघ गोल करू शकला नाही. या काळात इंटर मियामीला 28 व्या मिनिटाला एक चांगली संधी मिळाली, जेव्हा मेक्सिकन खेळाडू बर्टेरामेने बॉक्सच्या डाव्या बाजूने डाव्या पायाने शॉट मारला, ज्याला न्यू इंग्लंडचा गोलकीपर मॅट टर्नरने गोल होण्यापासून वाचवले.
दुसऱ्या हाफच्या 53 व्या मिनिटाला डॅनियल गाजदागच्या गोलच्या जोरावर यजमान संघ (न्यू इंग्लंड)ने खाते उघडले. 69 व्या मिनिटाला इंटर मियामीने शानदार सांघिक कामगिरीच्या जोरावर स्कोर 1-1 असा बरोबरीत केला. सेगोवियाने बॉक्सच्या आत एक ‘लॉब’ पास दिला, ज्यावर मेस्सीने हेडरने चेंडू बर्टेरामेच्या दिशेने टोलावला.
बर्टेरामेने बॉक्सच्या दिशेने हेडरने एक जोरदार प्रहार करत बॉलला गोल पोस्टमध्ये पोहचवले. हा या सध्याच्या हंगामातील बर्टेरामेचा 10 वा गोल होता, तर मेस्सीचा या लीगमधील 16 असिस्ट लीग राहिला.
India Vs Malaysia: नुसता राडाच! कर्णधार हरमनप्रीतची हॅट्रिक अन्…; मलेशियाचा दणदणीत पराभव
83 व्या मिनिटाला इंटर मियामीने सामन्याचे पारडे बदलले. एक सर्वोत्तम पासिंग सिक्वेंसनंतर मेस्सीने निर्णायक गोल केला. सुआरेजने बॉक्सच्या बाहेर मेस्सीच्या दिशेने बॉल पास केला, जिथे अर्जेंटीनाच्या या स्टार खेळाडूने तीन डिफेंडर्सला चकवले. त्यानंतर सेगोवियाच्या मदतीने त्याने बॉल बॉक्सच्या आत पोहचवला.
या गोलसह मेस्सीची एकूण गोल संख्या 26 झाली. ज्यामुळे तो एमएलएस 2026 गोल्डन बूटच्या शर्यतीत खूप पुढे निघून गेला आहे. तसेच या संध्याच्या हंगामात सेगोवियाच्या असिस्टची संख्या 12 झाली आहे. त्यानंतर 1-2 ची स्कोरलाइन अखेरची सिटी वाजेपर्यंत कायम राहिली, ज्यामुळे इंटर मियामीने आपल्या बाहेर खेळताना तीन गुण प्राप्त केले.
IND Vs NZ: पारडे जड मात्र न्यूझीलंडच्या मैदानात Team India…; काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?
Ans: इंटर मियामीने न्यू इंग्लंड रिव्हॅल्यूशनचा 2-1 असा पराभव केला.
Ans: मेस्सीने एक शानदार असिस्ट आणि सामन्याच्या 83 व्या मिनिटाला निर्णायक गोल केला.
Ans: मेस्सीच्या नावावर या हंगामात 26 गोल आणि 16 असिस्टची नोंद झाली आहे.






