
bcci
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये असणारी तीव्र उष्णता टाळण्यासाठी, पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) १० मार्च ते १५ मे या कालावधीत आयोजित करण्याचा विचार करत आहे. जर १० मार्चला स्पर्धा सुरु झाली तर १५ मे ला अंतिम सामना खेळला जाईल. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, आयपीएल २०२७ लवकर सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ‘खेळाडूंना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी, १० मार्च ते १५ मे दरम्यान स्पर्धा आयोजित करण्याचे आमचे लक्ष्य आहे. १५ मे नंतर देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णता वाढू लागते. म्हणून पुढच्या वर्षी स्पर्धा लवकर होण्याची शक्यता आहे. आयपीएल नेहमी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालते. सैकिया म्हणाले की, आयपीएल लवकर सुरू केल्याने केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर प्रेक्षकांनाही फायदा होईल.’
STORY | BCCI eyes Mar 10-May 15 IPL window next season amid heat concerns: Devajit Saikia In its bid to beat the extreme May heat in most parts of the country, the BCCI is contemplating an early start to the IPL, eyeing a March 10-May 15 window for future editions starting next… https://t.co/3oKYr3Vso5 — Press Trust of India (@PTI_News) June 18, 2026
आयपीएल २०२७ साठी सामन्यांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा होती. मात्र, देवजीत सैकिया यांनी पुढे सांगितले की, आयपीएल २०२७ मध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार नाही. ते म्हणाले, ‘येत्या काही वर्षांत परिस्थिती काय असेल हे मला माहीत नाही, पण सध्या तरी सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ पर्यंत वाढवण्याची कोणतीही शक्यता मला दिसत नाही, कारण यासाठी केवळ भारतातीलच नव्हे, तर आयसीसी क्रिकेट खेळणाऱ्या इतर देशांतील, विशेषतः ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील खेळाडूंच्या हिताचा विचार करणे आवश्यक असेल.’
मे महिन्याच्या शेवटच्या दिवासात वाढणाऱ्या तापमानाचा सामना करण्यासाठी स्पर्धा दोन आठवडे आधी सुरू करण्याचा विचार आहे, असे बोर्ड सचिवांनी सांगितले. ‘मार्च महिन्याच्या अखेरच्या ऐवजी स्पर्धा थोडी लवकर सुरू करता येईल का, यावर बीसीसीआय तसेच आमच्या आयपीएल नियामक परिषदेमध्ये चर्चा सुरू आहे,’असे ते म्हणाले.
IND vs AFG: शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी; कोहली-द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला