जोस बटलरचा कर्णधारपदाचा राजीनामा (फोटो- सोशल मिडिया)
क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडसंघाला एक मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत इंग्लंडला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कर्णधार जोस बटलरने एक मोठा निर्णय घेतला आहे. जोस बटलरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. स्पर्धा सुरू असतानाच जोस बटलरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
🚨 JOS BUTTLER HAS STEPPED DOWN AS ENGLAND CAPTAIN. 🚨
– Buttler will captain for the last time in the Champions Trophy tomorrow. pic.twitter.com/nfFS4xHkII
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 28, 2025
एक मार्च म्हणजे उद्याच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना जिंकून चॅम्पियन्स स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न इंग्लंड संघाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अफगाणिस्तानने ‘साहेबांना’ चारली धूळ
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये आज इंग्लंड विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात अत्यंत महत्वाचा सामना पार पडला. या जबरदस्त रोमांचक सामन्यात विजय मिळवला आहे. अफगणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. आजच्या विजयामुळे या स्पर्धेत इंग्लंड बाहेर गेला आहे. तर अफगणिस्तानच्या आशा अजूनही जिवंत आहेत.
इब्राहिम जार्दानचा कहर; लाहोरच्या मैदानावर रचला इतिहास
अफगाणिस्तानच्या इब्राहिम जार्दानने आज लाहोरच्या मैदानावर मोठा कहर केला. यामध्ये इब्राहिम जार्दानने इंग्लडच्या गोलंदाजांची धुलाई करीत 135 चेंडूत 151 धावा केल्या. सलामीवीर गुरबाज आणि इब्राहिम यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, गुरबाज लवकर बाद झाला परंतु त्यानंतर इब्राहिम जार्दानने धमाकेदार खेळी करीत अफगाणिस्तानला 300 धावापर्यंत नेले.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 325 धावा केल्या. यामध्ये सलामीला आलेल्या इब्राहिम झार्दानने शानदार खेळी करीत 146 चेंडूत 177 धावा केल्या. गुरबाज आज विशेष प्रभाव पाडू शकला नाही, त्याने सलामीला येऊन 6 धावा केल्या. त्यानंतर सेदिकुल्लाह अटलने 4 धावा केल्या. त्यानंतर रहमद शाह अवघ्या 4 धावा करून बाद झाला. हशमुतुल्लाह शाहिदीने 67 चेंडूत 40 धावा केल्या. अझमुत्तुलाह ओमराझाईने 31 चेंडूत 41 धावा केल्या. मोहम्मद नईबने 24 चेंडूत 40 धावा केल्या. आज अफगाणिस्तानकडून इब्राहिम झार्दानने इंग्लडसारख्या बलाढ्य संघाच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली. इब्राहिम झार्दानने वेगवान 177 धावा केल्या.
२३ वर्षीय इब्राहिम झद्रानने शतक ठोकल्यानंतर वेगळ्याच शैलीत आनंद साजरा केला. शतक पूर्ण केल्यानंतर, जद्रानने त्याचे हेल्मेट काढले आणि हात जोडले. ड्रेसिंग रूमकडे पाहत तो काहीतरी इशारा करत होता. झद्रान हा अफगाणिस्तानचा असाच एक फलंदाज आहे जो संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. जद्रानच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. झद्रान रहमानउल्लाह गुरबाजनंतर तो अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. गुरबाजने एकदिवसीय सामन्यात ८ शतके केली आहेत. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता अफगाणिस्तान एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला होता.