पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (फोटो- ट्विटर)
कसोटी कर्णधार म्हणून कुसल मेंडिसची ही पहिलीच सिरिज असणार आहे. धनंजय डी सिल्व्हाने अचानक कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, निवडकर्त्यांनी अनुभवी मेंडिसवर विश्वास दाखवला आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या निवडकर्त्यांनी संघात अनेक मोठे बदल केले असून, काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.
🇱🇰 SQUAD ANNOUNCEMENT | Sri Lanka Tour of Pakistan 🇵🇰 Here is your 15-member Sri Lanka Test Squad for the upcoming 2-match Test series against Pakistan! 🏏 #PAKvSL https://t.co/vEE90nI0rz — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 13, 2026
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?
पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या सिरिजसाठी श्रीलंकेने तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी देऊन त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ दिले आहे. खराब फॉर्म आणि तंदुरुस्तीच्या कारणांमुळे काही अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही. तर दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तसेच काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे.
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतर्गत खेळवली जाणारी ही सिरिज ९ नोव्हेंबरपासून रावळपिंडी येथे सुरू होणार आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात श्रीलंकेचा संघ या मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानविरुद्धची ही दोन कसोटी सामन्यांची मालिका ‘आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद’ स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही म्हणजेच पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
श्रीलंका संघ: कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका (फिटनेस मंजुरीवर आधारित), पसिंदु सोरियाबंदारा, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, धनंजय डी सिल्वा, अंजाला बंदारा (यष्टिरक्षक), सोनल दिनुषा, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायके, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, ईशान मलिंगा






