Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहम्मद शमीचा BCCI ला इशारा! घातक गोलंदाजीने पुन्हा उडवली फलंदाजांची भंबेरी; भारतीय संघात परण्याचा ठोकला दावा 

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघाच्या बाहेर असला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. शमी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी खेळताना शानदार प्रदर्शन करत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 08, 2025 | 06:52 PM
Mohammed Shami warns BCCI! Dangerous bowling has once again shaken the batsmen; Claims to return to the Indian team

Mohammed Shami warns BCCI! Dangerous bowling has once again shaken the batsmen; Claims to return to the Indian team

Follow Us
Close
Follow Us:

Syed Mushtaq Ali Trophy 2025 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे.  त्याने देशांतर्गत कामगिरीने सर्वांना चकित केल आहे. शमीचा आत्मविश्वास आणि गोलंदाजी कौशल्य अद्याप देखील अबाधित आहे. निवडकर्ते मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तरी मोहम्मद शमी प्रत्येक वेळी त्याच्या मैदानी कामगिरीने एक मजबूत इशारा देत आहे. सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे.

हेही वाचा : IND vs SA T20I series : भारत घरच्या मैदानावर ‘बॉस’! दक्षिण आफ्रिकेसाठी T20I मालिका जिंकणे दिवा स्वप्न का ठरत आहे?

हरियाणाविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी

हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात, बंगालकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीने हरियाणाविरुद्ध शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. मोहम्मद शमीने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये चार महत्त्वपूर्ण बळी टिपले. त्याने फक्त ३० धावा मोजत ४ बळी घेण्याची किमया साधली.  त्याच्या गोलंदाजीसमोर हरियाणाच्या फलंदाजांना जास्त काळ दम धरता आल नाही.

‘या’ फलंदाजांची केली शिकार

या सामन्यात, मोहम्मद शमीने यशवर्धन दलाल, सुमित कुमार, आशिष सिवाच आणि अमित राणा यांना माघारी पाठवले.  त्याच्या चेंडूंमधील तीक्ष्णता आणि स्विंग जबरदस्त होता. त्यामुळे त्याने सामना बंगालच्या बाजूने झुकवला. शमीची कामगिरी आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वात प्रभावी स्पेलपैकी एक मानण्यात येत आहे.

स्पर्धेत सातत्याने शानदार प्रदर्शन

मोहम्मद शमीने आतापर्यंतच्या सात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेण्याची किमया केली आहे. तो बंगालच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असून त्याने  प्रत्येक सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका वठवली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील टेकया कामगिरीवरुन हे दिसून येते की, तो अजून देखील भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.

शमी किती काळ संघर्ष?

मोहम्मद शमी भारताकडून त्याचा शेवटचा सामना २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो राष्ट्रीय संघात आपले स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.  तथापि, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला सतत दुर्लक्षित करण्यात असून असे का होत आहे? यावर आता  प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

मोहम्मद शमीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

३५ वर्षीय मोहम्मद शमीने भारतासाठी ६४ कसोटी, १०८ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळलेले आहेत. त्याच्याकडे कसोटीत २२९, एकदिवसीय सामन्यात २०६ आणि टी-२० सामने २७ विकेट्स जमा आहेत. आयपीएलमध्ये, शमीने १२० सामन्यांमध्ये १३३ विकेट्स मिळवल्या आहेत.

हेही वाचा : काय सांगता? 2025 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी वाईट स्वप्न! 40 दिग्गजांनी घेतला अखेरचा श्वास

 

 

 

Web Title: Mohammed shami warns bcci after brilliant performance in syed mushtaq ali trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • bcci
  • Mohammad Shami
  • Syed Mushtaq Ali Trophy 2025

संबंधित बातम्या

SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर
1

SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर

IND vs SA 3rd ODI : दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य; डी कॉकचे शानदार शतक 
2

IND vs SA 3rd ODI : दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य; डी कॉकचे शानदार शतक 

Syed Mushtaq Ali Trophy : सूर्यकुमार यादव तळपला! ऐतिहासिक टी-२० विक्रम केला उद्ध्वस्त; नंबर 1 स्थान केले काबिज
3

Syed Mushtaq Ali Trophy : सूर्यकुमार यादव तळपला! ऐतिहासिक टी-२० विक्रम केला उद्ध्वस्त; नंबर 1 स्थान केले काबिज

कधीकाळी बाथरूममध्ये रडायचा! आता भारतीय संघात पुनरागमनासाठी थोपटले दंड; वाचा सविस्तर 
4

कधीकाळी बाथरूममध्ये रडायचा! आता भारतीय संघात पुनरागमनासाठी थोपटले दंड; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.