दिलीप दोषी(फोटो-सोशल मीडिया)
40 players will die in 2025 : क्रिकेट जगतासाठी २०२५ हे वर्ष खूप वाईट ठरले आहे. या वर्षात क्रिकेट या खेळाशी संबंधित असणाऱ्या अनेक खेळाडूंनी अखेरचा श्वास घेतला आहे. यामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी ज्यांनी क्रिकेटला एक नवीन ओळख दिली. २०२५ मध्ये क्रिकेटर्सच्या मृत्युच्या बातमीने केवळ खेळाडूंनाच नाही तर कित्येक चाहत्यांना देखील वेदना दिल्या आहेत. २०२५ या वर्षभरात ४० हून अधिक क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया.
एका वृत्तांनुसार, जुलै २०२५ पर्यंत अंदाजे १४ क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांचे निधन झाले होते, परंतु वर्षाच्या अखेरीस ही संख्या ४० वर जाऊन पोहोचली होती. यावरून हे दिसूनण येते की, २०२५ हे क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट वर्षांपैकी एक ठरले आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेसह अनेक देशांनी त्यांचे क्रिकेटचे दिग्गज गांमवले आहेत. या खेळाडूंचे योगदान केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून त्यांनी क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे.
२०२५ मध्ये क्रिकेट जगताला अलविदा करणाऱ्या नावांमध्ये भारताचे दलीप दोशी यांचे नावे प्रमुख होते. २३ जून २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी भारतासाठी ३३ कसोटी सामन्यांमध्ये ११४ विकेट्स काढल्या आहेत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीने स्वतःची ओळख निर्माण केले.
इंग्लंडचे एमजे हॅरिस आणि डीव्ही लॉरेन्स, दक्षिण आफ्रिकेचे बीव्ही टूथ आणि झेडटीए न्दामाने, ऑस्ट्रेलियाचे जीएफ रोआर्क, अफगाणिस्तानचे बिस्मिल्ला शिनवारी, वेस्ट इंडिजचे जेसी अॅलन आणि झिम्बाब्वेचे एमए मेमन यांनी या वर्षी जगाचा निरोप घेतला. या सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी आपापल्या काळात क्रिकेटला बळकटी मिळवून दिली आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एका आदर्शाची निर्मिती केली.
या दिग्गजांच्या निधनानंतर चाहते निराश दिसले. त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून आपल्या हिरोंना श्रध्द्धांजली वाहली. यामध्ये कुणी लिहिले की “२०२५ ने आपले क्रिकेट हिरो हिरावून घेतले.” बीसीसीआयने श्रद्धांजली वाहताना दलीप दोशी यांना भारतीय क्रिकेटचा अभिमान म्हटले होते, तर ईसीबी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंच्या योगदानाचे स्मरण करून श्रद्धांजली संदेश जारी करण्यात आले होते.






