एमएस धोनी : 19 एप्रिल रोजी आयपीएल 2024 चा 34 वा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये काल लढत पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने शुक्रवारी IPL 2024 च्या 34 व्या सामन्यात 28 धावांची आक्रमक नाबाद खेळी खेळून इतिहास रचला. लखनौच्या एकना स्टेडियमवर 42 वर्षीय धोनीने केवळ 9 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या.
आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा एमएस धोनी पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. एमएस धोनीच्या खेळीच्या जोरावर CSK ने 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या. तथापि, एमएस धोनीची खेळी सीएसकेसाठी पुरेशी नव्हती कारण लखनौ सुपरजायंट्सने 19 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. महेंद्रसिंग धोनीने २८ धावांच्या नाबाद खेळीत आणखी एक कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. धोनीने 257 सामन्यात 5169 धावा केल्या आहेत. त्याने एबी डिव्हिलियर्सला (5162) मागे टाकले.
Another Milestone for MSD ?
5000 runs in IPL as a wicket-keeper ?
Follow the Match ▶️ https://t.co/PpXrbLNaDm#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/Wq40tK7FpW
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
CSK व्यतिरिक्त, धोनीने 2016 आणि 2017 हंगामात 30 सामन्यांमध्ये इतर संघांचे प्रतिनिधित्व केले. MS धोनी हा IPL मधील पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने वयाच्या 40 व्या वर्षी IPL मध्ये 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. वयाच्या ४० वर्षांनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने 481 धावा केल्या होत्या.