महेंद्रसिंह धोनीच्या येण्याने चेपॉक भारावले (फोटो- ट्विटर)
धोनी-धोनीच्या जयघोषाने दुमदुमले चेपॉक
धोनी खेळण्यासाठी फिट नसल्याचे ऋतुराजचे विधान
शेवटच्या सामन्यात खेळण्याची शक्यता
MS Dhoni For CSK/IPL 2026: आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबादमध्ये सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात चेन्नईच्या चाहत्यांचा आवडता, लाखो क्रिकेट प्रेमींचे जिवापाड प्रेम असणारा एम. एस धोनी म्हणजेच महेंद्रसिंह धोनी खेळणार अशी शक्यता वाटत होती. मात्र आजच्या सामन्यात देखील तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र आजचे स्टेडियममधील भावनिक वातावरण पाहण्यासारखे होते. चेन्नईचा पहिला डाव संपल्यानंतर धोनी मैदानात आला होता. सारे स्टेडियम भावुक झाले होते.
सीएसकेने प्रथम फलंदाजी केली. पहिला डाव संपल्यावर महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. तेव्हा स्टेडियम धोनी धोनीच्या घोषणेने दुमदुमून निघाले. हा स्टेडियममध्ये घडत असलेली प्रत्येक कृती ही धोनीच्या निवृत्तीची चाहूल तर नाही ना अशी शंका प्रत्येक चाहत्याच्या मनात येत होता. मैदानावरील तो सर्वात भावनिक करणारा असा प्रसंग होता. धोनीने निवृत्ती जाहीर केली तर तो कधीच आपल्याला खेळताना दिसणार नाही या भीतीने चाहते दु:खी झाले होते. त्यांच्या डोळ्यात धोनीचे प्रेम दिसून येत होते.
Dhoni Dharshanam 💛🫂🫡#CSKvsSRH #MSDhoni #Thala pic.twitter.com/0NvcAPevRT — Sanjeev Dherdu (@sanjeevdherdu) May 18, 2026
मैदानात नेमके काय घडले?
चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 180 रन्स केल्या. एसआरएचची फलंदाजी सुरू होण्याआधी कॅप्टन कुल मैदानावर आला होता. तेव्हा स्टेडियम झालेल्या आवाजाने सर्व रेकॉर्ड मोडले. कारण चाहत्यांसाठी तो अत्यंत भावनिक असा क्षण होता. धोनी मैदानावर येताच त्याने सीएसकेच्या खेळांडूसोबत फोटो देखील काढले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
टॉसवेळी ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?
टॉस झाल्यावर कर्णधार ऋतुराज गायकवाडला आजच्या सामन्यात धोनी खेळणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने धोनी खेळण्यासाठी अजूनही फिट नसल्याचे सांगितले. मात्र कोणास ठाऊक. आजचा सामना माही जिंकलो तर तो पुढील सामन्यात खेळण्यासाठी येऊ शकतो.
SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज
पॉकच्या क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दरम्यान चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून चेन्नईने 180 रन्स केल्या. आता क्वालिफाय होण्यासाठी एसआरएचला 181 रन्सचे टार्गेट दिले होते.






