SRH Vs CSK Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
चेन्नई सुपर किंग्ज अन् सनरायझर्स हैदराबाद भिडणार
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक
एम. एस. धोनी आज खेळणार का याकडे लक्ष
Tata IPL 2026 CSK Vs SRH Live Updates: आज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध एसआरएच खेळणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे. दरम्यान या सामन्यात सीएसकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुखापतीमुळे अद्याप धोनी या हंगामात एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील धोनी खेळणार नसल्याचे समोर येत आहे. आरसीबी सोडल्यास अद्याप कोणताही संघ क्वालिफाय झाला नाहीये. 7 संघ अजून शर्यतीत आहेत.
CSK vs SRH: चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या
आजचा सामना सीएसके आणि एसआरएच या दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहे. क्वालिफाय करण्यासाठी एसआरएचला आजचा सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे. तर टॉप 4 मध्ये जाण्यासाठी प्रत्येक सामना चेन्नईला जिंकावा लागणार आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर दुसरीकडे हैदराबाद जिंकली तर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनेल. प्लेऑफचे तिकिट मिळवण्यासाठी दोन्हीही संघासमोर आव्हान असणार आहे.
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील पिच गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. एकेकाळी फिरकी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरणारी खेळपट्टी आता फलंदाजीसाठी देखील अनुकूल मानली जाते. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही या खेळपट्टीवर फायदा होऊ शकतो. येथे खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या स्टेडियमवर एकूण ९७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ५० सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर ४७ सामने नाणेफेक गमावलेल्या संघाने जिंकले आहेत. या पिचवर सर्वाधिक धावसंख्या २४६/५ इतकी आहे.
चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन






