मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केली कमाल (फोटो- ट्विटर)
Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad IPl 2025: सध्या हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्स प्रथम गोलंदाजी करत आहे. मात्र मुंबईच्या गोलदाजांनी सनरायझर्स हैदराबादला घाम फोडला आहे. पॉवरप्लेमध्येच हैदराबादच्या संघाने आपल्या महत्वाच्या ४ विकेट्स गमवल्या आहेत.
4⃣ wickets in quick succession for #MI. #SRH's top 4⃣ back in the hut.
Updates ▶️ https://t.co/nZaVdtxbj3 #TATAIPL | #SRHvMI | @mipaltan pic.twitter.com/1eo81beUCv
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
दीपक चाहरने गोलंदाजीला सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी यांनी आपल्या विकेट्स गमावल्या आहेत. हैदराबाद आणि मुंबई यांच्यामध्ये आतापर्यत २४ सामने झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यत १४ सामने हैदराबादविरुद्ध जिंकले आहेत. तर हैदराबादच्या संघाने या मुंबईविरुद्ध १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध १० सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आजच्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
१७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा सामना झाला होता. आज हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने वानखेडेवर ४ विकेट्सने विजय मिळवला होता. सध्या मुंबईचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. आजच्या सामन्यांमध्ये मुंबईचा विल जॅक्स आज हैदराबादसाठी धोका ठरू शकतो. त्याचबरोबर रोहित शर्माचा देखील फॉर्म त्याने पुन्हा मिळवला आहे.
रिषभ पंत आणि जहीर खानमध्ये चालू सामन्यात बाचाबाची, LSG डगआउटमधील व्हिडिओने उडवली खळबळ
सूर्यकुमारने देखील मागील सामन्यांमध्ये कमालीची खेळी खेळली होती त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ मजबूत स्थितीत आहे. जसप्रीत बुमराह आज कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट/मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, इशान मलिंगा
हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.