फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad/Mumbai Indians
SRH vs MI Head to Head Statistics : आज इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ४१ वा राजीव गांधी मैदानावर सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल मैदानावर होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मागील तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने तीनही सामन्यात विजय मिळवून दमदार कमबॅक केला आहे. हैदराबादच्या संघाने पहिल्या सामन्यानंतर अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. संघाने फक्त २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ७ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ५ सामने जिंकले आहेत.
हैदराबाद आणि मुंबई यांच्यामध्ये आतापर्यत २४ सामने झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यत १४ सामने हैदराबादविरुद्ध जिंकले आहेत. तर हैदराबादच्या संघाने या मुंबईविरुद्ध १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध १० सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आजच्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
#MI has 277 reasons to avenge their defeat the last time they were here & #SRH need to take revenge for their defeat in Wankhede this season. ⚔
Who will emerge victorious? 💬#IPLRevengeWeek 👉 #SRHvMI | WED, 23 APR, 6:30 PM | LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi &… pic.twitter.com/2ZAbjuHOcf
— Star Sports (@StarSportsIndia) April 22, 2025
१७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा सामना झाला होता. आज हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने वानखेडेवर ४ विकेट्सने विजय मिळवला होता. सध्या मुंबईचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. आजच्या सामन्यांमध्ये मुंबईचा विल जॅक्स आज हैदराबादसाठी धोका ठरू शकतो. त्याचबरोबर रोहित शर्माचा देखील फॉर्म त्याने पुन्हा मिळवला आहे.
रिषभ पंत आणि जहीर खानमध्ये चालू सामन्यात बाचाबाची, LSG डगआउटमधील व्हिडिओने उडवली खळबळ
सूर्यकुमारने देखील मागील सामन्यांमध्ये कमालीची खेळी खेळली होती त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ मजबूत स्थितीत आहे. जसप्रीत बुमराह आज कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट/मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, इशान मलिंगा
हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.