नारायण जगदीशन(फोटो-सोशल मीडिया)
Southern Division vs Northern Division : बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात बेंगळुरू येथील बीसीसीआय सीओई ग्राउंड-२ वर खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवसाअखेर दक्षिण विभागाने ३ विकेट गमावून २९७ धावा उभारल्या आहेत. दक्षिण विभागाचा सलामीवीर फलंदाज नारायण जगदीसनने नाबाद १४८ धावा करून संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे.
उत्तर विभागाचा कर्णधार अंकित कुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंकितचा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसले. उत्तर विभागाचे गोलंदाज पूर्णता निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. दुसरीकडे, पहिल्याच दिवशी दक्षिण विभागाने शानदार फलंदाजी केली. दक्षिण विभागाच्या सलामीवीर फलंदाजांनी शतकी भागीदारी रचून संघाला बळकट केले.
हेही वाचा : नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमितीत पडेल ‘इतकी’ भर
दक्षिण विभागाकडून डावाची सुरुवात करणाऱ्या नारायण जगदीसन आणि तन्मय अग्रवाल यांनी १०३ धावांची भागीदारी उभारली. तन्मय अग्रवाल अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच ४३ धावा करून बाद झाला. त्यानंतर जगदीशनला साथ देण्यासाठी देवदत्त पडिक्कलने मैदानात ठाण मांडले. पडिक्कल येताच जगदीशनने आपले अर्धशतक पूर्ण करून टाकले.
अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर जगदीशनने आपल्या शतकाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. त्याच वेळी देवदत्त पडिक्कलने देखील त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये १२८ धावांची मोठी भागीदारी देखील झाली. या दरम्यान नारायण जगदीशननेही आपले शतक झळकवले. तर ५७ धावा करून देवदत्त पडिक्कल आऊट झाला.
पडिक्कलनंतर आलेला मोहित काळे फार काही काळ धरू शकला नाही. त्याने १५ धावा केल्या आणि तो बाद झाला. दक्षिण विभागाचा तिसरी विकेट २६० धावांवर पडली. त्यानंतर, कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन जगदीशनला साथ देण्यासाठी मैदानात उतरला दोघांमध्ये ३७ धावांची भागीदारी रचल्या गेली. खेळ संपेपर्यंत दोन्ही फलंदाज नाबाद राहिले.
हेही वाचा : ‘गोल्फ खेळायला लगा…’, युवराज सिंगचा शुभमन गिलसह ‘या’ खेळाडूला सल्ला! नेमकं काय आहे कारण?
नारायण जगदीशनने २६० चेंडूंमध्ये नाबाद १४८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १५ चौकार आणि २ षटकार देखील मारले. ११ धावा काढून मोहम्मद अझरुद्दीन नाबाद आहे. उत्तर विभागाकडून निशांत सिंधूने २ विकेट्स घेतल्या. तर अंशुल कंबोजने एक बळी टिपण्यात एष मिळवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण विभाग मजबूत स्थितीत पोहचला, तर उत्तर विभागाचे गोलंदाज मात्र निष्प्रभ दिसूनयाळे होते.