स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)
GST slab burden on IPL 2026 tickets : आयपीएल २०२६ मधील १९व्या हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे. कारण कर दरात वाढ झाल्यामुळे आता सामन्यांच्या तिकिटांच्या किमती थेट वाढ करण्याचा विचार करण्यात येण्याचा विचार करण्यात येत आहे. याचा थेट परिणाम आता सामान्य प्रेक्षकांच्या खिशावर होणार आहे. जे क्रिकेटप्रेमी दरवर्षी स्टेडियममध्ये जाऊन आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तिकिटे खरेदी करत असतात.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या एका अहवालानुसार, इंडियन प्रीमियर लीगच्या तिकिटांवर आता २८% ऐवजी ४०% कर आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या तिकिटांच्या किमतीती वाढ होत असली तरी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहण्यासाठी मात्र तिकिटे स्वस्त होणार आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांवरील कर २८% वरून १८% पर्यंत कमी केला गेला आहे.
हेही वाचा : लिटन दासचा टी-२० मध्ये मोठा कारनाम! शकीब अल हसनचा विक्रम मोडला, बांगलादेशसाठी ‘असे’ करणारा ठरला पहिला फलंदाज
जर तिकिटाची मूळ किंमत १००० रुपये असणार आहे तर कर लावल्यानंतर ती आता १४०० रुपये होणार आहे. पूर्वी कर लावून १२८० रुपये तिकीटाची किंमत आता १४०० रुपये होणार आहे. या करवाढीमुळे आयपीएल आता देशातील सर्वोच्च कर स्लॅबमध्ये समाविष्ट झाला आहे. यामध्ये आता कॅसिनो, रेस क्लबसारखे व्यवसाय देखील येतात.
तर आता भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. आता या सामन्यांच्या तिकिटांवरील असणारा २८% जीएसटी कर काढून टाकण्यात आला आहे, त्यामुळे आता पूर्वीपेक्षा तिकिटे आता स्वस्त होणार आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि आयपीएल दोन्हीवर हाच २८% कर आकरण्यात येत होता. परंतु आता सरकारने आंतरराष्ट्रीय सामने या कर स्लॅबमधून काढून टाकले आहेत.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या नवीन अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, “हा वाढलेला कर फक्त आयपीएलसारख्या क्रीडा स्पर्धांवर लागू होणार, या बदलामुळे सामान्य प्रेक्षकांना दिलासा मिळेल आणि त्यांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत.”
आतापर्यंत, मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांसाठी ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर १८% जीएसटी आकरण्यात येत होता. तर ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीची तिकिटे पूर्णपणे करमुक्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा : ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?
नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. जे भारतातील पुढील मोठ्या स्पर्धेच्या, महिला विश्वचषकाच्या फक्त एक आठवडा आधी होणार आहेत. या स्पर्धेच्या तिकिटांची विक्री अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.