युवरज सिंग(फोटो-सोशल मीडिया)
Yuvraj Singh’s advice to Abhishek Sharma along with Shubman Gill : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगची प्रसिद्धी त्याच्या निवृत्तीनंतर अजून देखील कायम आहे. तो वेळोवेळी आपले मत मांडत असतो. अशातच त्याने आयजीपीएलच्या एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. त्याने भारतात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या आयजीपीएलबद्दल खूप आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल बोलताना म्हटलं आहे की, “आयजीपीएलचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण मला वाटतं की गोल्फ एखाद्या देशात विकसित होणे गरजेचे आहे. ते संस्कृतीचा एक भाग बनायला हवे.” यातच त्याने भारताच्या दोन स्टार खेळाडूंना गोल्फ खेळण्याचा सल्ला देखील दिला आहे.
युवराज सिंग म्हणाला की, “जेव्हा मी उशिरा गोल्फ खेळण्यास सुरुवात केली होती. तथापि, मला जाणवले की ते वयामुळे शक्य नव्हते. अर्थात, मी सर्व गोल्फर्ससोबत खेळलेलो आहे.” माझा एक चांगला मित्र शिव कपूर आहे ज्याने मला गोल्फमधील काही उत्तम ट्रिक्स देखील शिकवल्या आहेत.”
हेही वाचा : लिटन दासचा टी-२० मध्ये मोठा कारनाम! शकीब अल हसनचा विक्रम मोडला, बांगलादेशसाठी ‘असे’ करणारा ठरला पहिला फलंदाज
भारत आणि जगभरातील अनेक क्रिकेटपटू गोल्फ या खेळात आपले नशीब आजमावताना दिसत असतात. युवराज सिंग, कपिल देव, अजय जडेजा, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांसारखे दिग्गजांचे गोल्फ खेळण्याचे फोटो चाहत्यांना आकर्षित करत आले आहेत. युवराज म्हणतो की, “मला वाटते की गोल्फ हा एक अद्भुत असा खेळ प्रकार आहे आणि गोल्फपटूंचे जीवन खूप कठीण असते. जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा तुम्हाला तुमचे बिल भरावे लागत असते.”
युवराज सिंग पुढे म्हणाला की, “मी अनेक वेळा तरुण क्रिकेटपटूंना सांगत आलो आहे की, त्यांनी गोल्फ हा खेळ खेळायला पाहिजे. गोल्फ तुम्हाला खूप काही शिकण्याची संधी देतो. जर तुम्ही क्रिकेटमध्ये काही चूक केली तर तुम्ही बाहेर पडता. तर जर तुम्ही गोल्फमध्ये चूक केली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वतःला पुन्हा एकदा सुधारण्याची संधी देता.”
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी UAE चा संघ जाहीर! मोहम्मद वसीम करणार नेतृत्व; ‘या’ खेळाडूंना लागली लॉटरी
युवराज सिंग म्हणतो की, “मी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना देखील गोल्फ खेळायला सांगितले आहे. मी सर्व तरुण खेळाडूंना गोल्फ खेळायचे सांगत असतो. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांमध्ये क्रिकेटपटू खूप लहान वयातच क्रिकेट खेळायला लागतात. लहान वयात जास्त क्रिकेटचा सराव करणे चांगले नाही. गोल्फ तुम्हाला आराम करायला आणि आराम करण्यास खूप मदत करतो.”