Dwayne Bravo Retirement : वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने 26 सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या निवृत्तीच्या एका दिवसानंतर, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने ब्राव्होला IPL 2025 साठी संघाचा नवीन मार्गदर्शक म्हणून घोषित केले आहे. ड्वेन ब्राव्हो मागील 2 हंगामात आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होता. आता प्रश्न असा आहे की चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी ड्वेन ब्राव्होची जागा कोण घेणार? चला तर मग जाणून घेऊया त्या ३ मोठ्या नावांबद्दल, जे ब्राव्होची जागा CSK मध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून घेऊ शकतात.
1. भरत अरुण
भरत अरुण हे आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. ड्वेन ब्राव्हो जर केकेआरमध्ये मार्गदर्शक म्हणून येत असेल तर त्याला गोलंदाजी प्रशिक्षकाचीही भूमिका दिली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत 61 वर्षीय भरत अरुण केकेआरमधून बाद होऊ शकतो. अरुण यापूर्वी 2014-2016 आणि त्यानंतर 2017-2021 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. तो 2024 मध्ये आयपीएल चॅम्पियन KKR चा गोलंदाजी प्रशिक्षक होता आणि जर कोलकाताने त्याला पुढील हंगामासाठी सोडले, तर CSK अनुभवी गोलंदाजी प्रशिक्षक जोडण्यास मागेपुढे पाहणार नाही.
2. अनिल कुंबळे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक 956 विकेट घेणारा अनिल कुंबळे 2016-2017 मध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. तो आरसीबी आणि एमआयचा मार्गदर्शक आहे आणि 2020-2022 पर्यंत पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षकही होता. कुंबळेकडे कोचिंगच्या अनुभवाची कमतरता नाही, त्यामुळे CSK त्याला गोलंदाजी प्रशिक्षकाचा पर्याय म्हणून विचार करू शकते.
3. अल्बी मॉर्केल
दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू ॲल्बी मॉर्केल 2008-2013 दरम्यान चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी 2021 पर्यंत नामिबिया क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली. MLC 2023 मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ आणि टेक्सास सुपर किंग्जला गोलंदाजी प्रशिक्षण देण्याचाही त्याला अनुभव आहे. तो सीएसकेचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या हाताखाली खेळला आहे, त्यामुळे मॉर्केलचा त्याच्यासोबतचा संबंध सीएसकेसाठी फायदेशीर ठरू शकतो.