फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाउंट
पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा : पॅरिस ऑलिम्पिकसाठी जगभरामधील सर्वच खेळाडूंनी मागील काही वर्ष तयारी केली आहे. त्याचबरोबर पॅरिसमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जगभरामधून वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची जोरदार तयारी सुरु आहे. ऑलिम्पिकच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कशाप्रकारे ऑलिम्पिकची तयारी सुरु आहे यासंदर्भात काही दृश्य दाखवण्यात आली आहेत. यावरून दिसत आहे की यंदाचा ऑलिम्पिक हा फार मोठा आणि वेगळा असणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकचा यंदाचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा हा एखाद्या स्टेडियमवर न होता सीन नदी आणि ट्रोकाडेरो येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर या उद्घाटन सोहळा ६ किलोमीटरच्या परिसरामध्ये होणार आहे. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात लोक पाहायला येणार आहेत. या सर्व गोष्टींचे बारकाईने आयोजन करण्यात आले आहे. आयफेल टॉवरच्या परिसरामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
Get ready for a once-in-a-lifetime spectacle as the #Paris2024 Opening Ceremony takes over a 6km stretch of the Seine River and Trocadero! 🚤✨
Dive into the making of the first-ever non-stadium Olympic Opening Ceremony in the “La Grande Seine” series.#Olympics | #Paris2024… pic.twitter.com/ZIPJLef9WT
— The Olympic Games (@Olympics) July 21, 2024
ऑलिम्पिकच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अनेकजण उद्घाटन सोहळ्याची मोठ्या प्रमाणात तयारी करताना दिसत आहेत. ऑलिम्पिकच्या काही अधिकारी या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे यासंदर्भात माहिती देत आहेत.
Happy Olympic week! 🙌 The Opening Ceremony is this Friday! In just 4️⃣ days! #Paris2024 @Paris2024 pic.twitter.com/supOwtR9vL
— The Olympic Games (@Olympics) July 22, 2024
भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ पदके जिंकली होती त्यामुळे आता भारताच्या चाहत्यांना खेळाडूंकडून १० हुन अधिक पदकांची अपेक्षा आहे.