फोटो सौजन्य - सोशल मिडिया
New Zealand vs South Africa : न्यूझीलंडच्या संघाने विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पराभूत करुन फायनलनमध्ये प्रवेश केला होता. आता हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडचे कर्णधारपद हे मिचेल सॅंटनर सांभाळत आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपद हे केशव महाराजकडे या मालिकेमध्ये सोपवण्यात आले आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे.
मालिकेतील दुसरा सामना १७ मार्च रोजी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी आता संघाची नजर दुसऱ्या विजयावर संघाची नजर असणार आहे. तथापि, दुसऱ्या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज जखमी झाला आहे.
दुसऱ्या सामन्यापूर्वी सराव करताना ईश सोधीला दुखापत झाली होती. सराव सत्रादरम्यान सोधीला अंगठ्याला दुखापत झाली. स्कॅनमध्ये अंगठ्याचे तुकडे झाल्याचे दिसून आले. त्याच्या बोटाला बरे होण्यासाठी किमान चार आठवडे लागतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी लॉकी फर्ग्युसनचा संघात समावेश झाल्यामुळे, पुढील सामन्यासाठी कोणत्याही खेळाडूचा समावेश केला जाणार नाही.
An update from the squad ahead of the second T20I in Hamilton. Wishing Ish a speedy recovery!#NZvSA pic.twitter.com/fOIyw8hw1K — BLACKCAPS (@BLACKCAPS) March 15, 2026
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना १७ मार्च रोजी हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जाईल. न्यूझीलंड संघाने एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे की, “विश्वचषक स्पर्धेनंतर तो त्याच्या घरच्या चाहत्यांसमोर खेळण्यास उत्सुक होता. त्याला टी-२० स्वरूपात बराच अनुभव आहे, त्यामुळे उर्वरित मालिकेत त्याची उणीव भासेल. आम्हाला विश्वास आहे की मिच (सँटनर) आणि कोल (मॅककॉन्ची) यांच्यासह लॉकीच्या पुनरागमनामुळे, संघ शेवटच्या दोन सामन्यांसाठी तयारी करण्यापूर्वी आमच्याकडे पुढील दोन सामन्यांसाठी पुरेसे पर्याय आहेत.”
मिचेल सँटनर (कर्णधार), केऑन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेन क्लीव्हर (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, जॅक फॉल्क्स, बेव्हॉन जेकब्स, काइल जेमिसन, निक केली, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), जेडेन लेनोक्स, कोल मॅककोन्ची, जिमी नीशम, टिम रॉबिन्सन, बेन सीयर्स, नाथन स्मिथ.






