इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (फोटो- ians)
उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने इंग्लंडचा आत्मविष्यवास वाढला आहे. त्यामुळे दुसरी कसोटी जिंकून ही सिरिज जिंकण्याचा प्रयत्न इंग्लंडचा संघ करताना दिसून येईल. तर पाकिस्तानचा संघ ही मालिका जिवंत ठेवण्यासाठी पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…
दरम्यान दुसऱ्या सामन्याच्या आधी पाकिस्तानच्या संहासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम लॉर्डस कसोटीत खेळताना दिसणार आहे. मागील सामन्यात दुखापत झाल्याने कर्णधार बाबर आझम खेळू शकला नव्हता. बाबर आझम खेळणार असल्याने पाकिस्तानची ताकद वाढणार आहे.
लॉर्डसच्या मैदानावर उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकीसस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. इंग्लंडचा संघ सिरिज जिंकण्यासाठी तर पाकिस्तानचा संघ सिरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्याचे भारतातील टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क च्या सोनी टेन-५ या चॅनेलवर केले जाणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅपवर उपलब्ध असेल. चाहते मोबाईल अॅपवर लॉग इन करून किंवा वेब ब्राऊझरवर सोनी लिव्हच्या अधिकृत वेबसाईटवरून थेट सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?
पाकिस्तानच्या संघाचा लॉर्डसच्या मैदानावर रेकॉर्ड चांगला असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने या ठिकाणी 15 कसोटी सामने खेळले आहेत. तर यामध्ये 5 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर इंग्लंडने आपल्या घरच्या मैदानावार 147 पैकी 61 सामने जिंकले आहेत आणि 35 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.






