पाकिस्तानी लष्कर बघणार श्रीलंकन संघाची सुरक्षा(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan Army will ensure the security of Sri Lankan team : पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट घडून आला. त्यानंतर देखील श्रीलंकेच्या संघाने त्यांचा दौरा सुरू ठेवला आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री आणि PCB चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी श्रीलंकेच्या संघाची भेट घेतली आणि त्यांना सुधारित सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर, पाकिस्तान सरकारकडून श्रीलंकेच्या क्रिकेट संघाची सुरक्षा पाकिस्तानच्या सशस्त्र दलांकडे सोपवण्यात आली आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सांगितले की श्रीलंकेच्या संघाला आता राज्यस्तरीय सुरक्षा पुरवण्यात येत आहे. ज्यामध्ये पोलिस, सैन्य आणि रेंजर्स संयुक्तपणे त्यांची सुरक्षा सुनिश्चित करत आहेत.
गुरुवारी रात्री रावळपिंडी स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत झालेल्या बैठकीमध्ये नकवी यांनी माध्यमांना सांगितले की, श्रीलंकेच्या सरकार आणि श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ दौरा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी दुजोरा दिल आहे की, इस्लामाबादमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेचे काही खेळाडू पाकिस्तान सोडून मायदेशी परतण्याच्या तयारीत होते. तथापि, त्यांनी असे देखील सांगितले की पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सर्वोच्च नेतृत्वात सतत संवाद आणि वाटाघाटींमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून ज्यामुळे सकारात्मक निकाल मिळण्यास मदत झाली आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख बोलतात
नकवी यांनी सांगितले की, लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी श्रीलंकेच्या संरक्षणमंत्री प्रमिता बंदरा तेन्नाकून यांना संघाच्या सुरक्षिततेबाबत आश्वासन दिले होते. ते म्हणाले की, “फील्ड मार्शल यांनी स्वतः श्रीलंकेच्या संरक्षणमंत्री आणि सचिवांशी संवाद साधला आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि मोठे शौर्य दाखवले याबद्दल मी आभारी आहे.”
हेही वाचा : पाकिस्तानने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिला झटका, T20 ट्राय सिरीज खेळण्यास दिला नकार
तसेच, नक्वी म्हणाले की, त्यांनी वैयक्तिकरित्या श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत एक बैठक घेतली आणि त्यांना हमी दिली की त्यांची सुरक्षा ही पाकिस्तान सरकारची एकमेव जबाबदारी असेल. नक्वी यांनी हे देखील आठवणीने सांगितले की, रावळपिंडीमध्ये सुरक्षा धोक्यांबद्दल विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून सप्टेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानचा कसोटी दौरा रद्द करण्यात आला होता.






