
पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव (फोटो सौजन्य - X.com)
खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल
खेळपट्टीचा वेग, स्विंग आणि अचूक टप्पा व दिशा यांचा पुरेपूर फायदा घेत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजसाठी, युवा गोलंदाज जेडन सील्स आणि जस्टिन ग्रीव्हज यांनी आपल्या घातक गोलंदाजीने पाहुण्या संघाला उद्ध्वस्त केले, तर पाकिस्तानसाठी, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने आपल्या स्विंगने कॅरिबियन फलंदाजांना त्रस्त केले. दोन्ही डावांमध्ये फिरकी गोलंदाजांना गोलंदाजीची संधी मिळाली, परंतु त्यांना एकही बळी घेता आला नाही.
तीन गोलंदाजांनी ५ बळी मिळवले
🚨 West Indies beat Pakistan by 90 runs while defending just 210 in the 4th innings. 🔥 – Jayden Seales take 5/20. pic.twitter.com/NKxmIBXVkd — Cricket in Asia (@ICCAsiaCrickett) July 29, 2026
या सामन्यातील वेगवान गोलंदाजांच्या वर्चस्वामुळे ५ बळी घेण्याचे अनेक विक्रमही नोंदवले गेले. पाकिस्तानच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या जस्टिन ग्रीव्ह्सने केवळ २७ धावांत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बासने आपल्या धारदार स्विंगचा वापर करून दुसऱ्या डावात २२ धावांत ५ वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद केले. दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या डावात वेस्ट इंडिजच्या जेडन सील्सने १८ धावांत ५ बळी घेत पाकिस्तानी फलंदाजी उद्ध्वस्त केली.
पाकिस्तानचा आणखी एक मानहानीकारक पराभव
वेगवान गोलंदाजांचे अभूतपूर्व वर्चस्व असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने शानदार कामगिरी करत पाकिस्तानला ९० धावांनी पराभूत केले. विजयाचे लक्ष्य गाठताना, दुसऱ्या डावात पाकिस्तानी संघ वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांसमोर पूर्णपणे हतबल दिसला आणि केवळ १२० धावांत गारद झाला. वेगवान गोलंदाजांनी सर्व ४० बळी घेण्याचा हा दुर्मिळ पराक्रम क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. पाकिस्तानचे आधीच क्रिकेटमध्ये नाव खराब झाले आहे. आता वेस्ट इंडिजच्याविरूद्ध खेळानंतर तर अधिक नाचक्की झाल्याचे दिसून आले. वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला नेस्तनाबूत केल्याचे दिसून आले आहे.
15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा चाहता झाला कर्णधार Shreyas Iyer, झिम्बाम्ब्वे सिरीजनंतर म्हणाला…