Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parali Politics: कोट्यवधींच्या फायली गायब; धनंजय मुंडे बोगस मतदानावर आमदार? माजी नगराध्यक्षाचे गंभीर आरोप

परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या जागेवर त्यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 10, 2025 | 11:39 AM
Parali Politics: कोट्यवधींच्या फायली गायब; धनंजय मुंडे बोगस मतदानावर आमदार? माजी नगराध्यक्षाचे गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश
  • धनंजय मुंडेंचा मनमानी कारभार
  • धनंजय मुंडे बोगस मतदानावर निवडून आलेत

Sharad Pawar & Dhananjay Munde: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोपही केले आहे. त्यांच्या प्रवेशा वेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, परळीतील अर्धवट विकासकामांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपे दीपक देशमुख यांनी केले आहेत. सुरुवातील गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील परस्पर वादामुळे माझे तिकीट कापले गेले, त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो, याचे कोणी श्रेय घेण्याचे काम नाही. परळीत अर्धवट विकासकामांमळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांपासून मी काम करतो होते. लोकसभा निवडणुकीत मी पंकजा मुंडेंसाठी काम केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंसाठी काम केले. पण परळीत सुरू असलेल्या बोदस मतदानाबाबत मी धनंजय मुंडेंना मी सांगितलं होतं की आपण निवडून येऊ, पण हे प्रकार थांबवले पाहिजेत. पण त्यावर त्यांनी काहीही काम केलं नाही. मी गेल्या दीड महिन्यापासून प्रचार सुरू केला असून आता परळीतील जनताही माझ्यासोबत आहे, असं दीपक देशमुख यांनी सांगितलं.

Bihar Election 2025: EVM इंटरनेटशी जोडलेला नसतानाही मतदानाचा डेटा निवडणूक आयोगापर्यंत लवकर कसा पोहोचतो?

धनंजय मुंडेंचा मनमानी कारभार

परळीत सुरू असलेल्या बोगस कामांचा प्रकार मी अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सांगितला होता. एकदानाही तर तीन वेळा त्यांना सांगितला होता.पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यात सगळी मिलीभगत असल्याने मी शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हजारो कोटींचा निधी मिळूनही परळीत कुठलेही काम पूर्ण झाले नाही. तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कामही अर्धवट आहे. धनंजय मुंडे सगळा कारभार बंगल्यावर बसून केला, असा आरोपही त्यांनी केला.

धनंजय मुंडे बोगस मतदानावर निवडून आलेत

“परळीत सगळे आम्हाला ‘अर्धवटराव’ म्हणतात, कारण नगराध्यक्ष असताना धनंजय मुंडे यांनी आम्हाला काम करू दिलं नाही. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलोय, म्हणजे अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करणार,” असं सांगताना माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.

देशमुख म्हणाले, “नगरपरिषदेतून कोट्यवधी रुपयांच्या टेंडरच्या फाईली गायब आहेत. त्यामुळे हजारो कोटी रुपयांची कामं अर्धवट राहिली आहेत. धनंजय मुंडे हे बोगस मतदानावर निवडून आले आहेत. विधानसभेला त्यांना जेवढी मतं मिळाली होती, ती आता मिळतायत का ते बघा. आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांतील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकले आणि त्याच कार्यकर्त्यांनी जाऊन बोगस मतदान केलं.” या आरोपांनंतर परळीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.

Amravati News : शेकोट्या पेटल्या; तापमानात घसरण! चिखलदऱ्यात धुक्याची चादर;

परळीतील नगराध्यक्ष पदाची निवडणूक संध्या देशमुख लढवणार

परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या जागेवर त्यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. मी पक्षनिष्ठ नाही नसून व्यक्तीनिष्ठ माणूस आहे. त्यामुळे मी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे दीपक देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांचा प्रवेश धनंजय मुंडे यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Parali politics files worth crores missing dhananjay munde mla on bogus voting serious allegations by former mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • Nationalist Congress Party
  • parali
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Parth Pawar Controversy: अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरे करणार काय?
1

Parth Pawar Controversy: अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरे करणार काय?

शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
2

शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Munde Vs Jarange Patil: “जरांगे हे तुम्हाला महागात…”; धनंजय मुंडेंचे ‘त्या’ आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
3

Munde Vs Jarange Patil: “जरांगे हे तुम्हाला महागात…”; धनंजय मुंडेंचे ‘त्या’ आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil: बदनामी, खून, घातपात! बीडच्या रेस्टहाऊसमध्ये काय घडलं? जरांगेंनी सगळा घटनाक्रमच सांगितला
4

Manoj Jarange Patil: बदनामी, खून, घातपात! बीडच्या रेस्टहाऊसमध्ये काय घडलं? जरांगेंनी सगळा घटनाक्रमच सांगितला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.