फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Paris Paralympics 2024 LIVE : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा कहर जगभरामध्ये सुरु आहे, सध्या भारताचे पॅरा खेळाडू पॅरिसमध्ये दमदार कामगिरी करत आहेत. मागील तीन दिवसांमध्ये भारताच्या पॅरा खेळाडूंनी ५ पदक नावावर केले आहेत. आज पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा चौथा दिवस सुरु झाला आहे. यामध्ये भारताचे अनेक पॅरा बॅडमिंटनपटू, ॲथलेटिक्स, आर्चर त्याचबरोबर टेबल टेनिसपटू ॲक्शनमध्ये असणार आहेत. आजच्या दिवसभरामधील भारतीय पॅरा खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. आजच्या पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी नवराष्ट्र डिजिटलवर तुम्हाला अपडेट देत राहणार आहोत.
01 Sep 2024 03:37 PM (IST)
भारताचा पॅरा भालाफेकपटू रोंगाळी रवी सध्या ॲक्शनमध्ये आहे, त्याचा पहिला थ्रो १०.४४ गेला आहे आणि दुसरा थ्रो १०.४९ गेला या थ्रोसह तो सध्या चौथ्या स्थानावर आहे. पोर्तुगीजचा भालाफेकपटू पहिल्या ११.२१ मीटर थ्रोसह पहिल्या स्थानावर आहे.
01 Sep 2024 02:04 PM (IST)
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू मनीषा रामदास हिने जपानच्या बॅडमिंटनपटूला पराभूत करून सेमीफायनल गाठली आहे. मनीषा रामदासने मामिको टोयोडा हीच २१-१३ आणि २१-१६ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
#ParisParalympics2024 #Paralympics2024
MANISHA CONFIRMS 2nd PARA-BADMINTON MEDAL FOR INDIA
2nd seed Manisha Ramadass beat 🇯🇵 Toyoda 21-13 21-16 in the QF to move into SF.
SF is all-🇮🇳 vs Thulasimathi at 2am tonight.
Earlier, Mandeep (vs 🇳🇬) and Palak (vs 🇮🇩) lost their QF pic.twitter.com/Q1U872zv9N
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) September 1, 2024
01 Sep 2024 01:06 PM (IST)
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू पलक कोहली इंडोनेशियाच्या खलिमतुस सादियाहविरुद्ध सामना झाला. यामध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पलक कोहलीला १९-२१ आणि १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला आहे.
01 Sep 2024 12:51 PM (IST)
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू पलक कोहली इंडोनेशियाच्या खलिमतुस सादियाहविरुद्ध खेळत आहे, या सामन्यामध्ये तिचा पहिल्या गेममध्ये पराभव झाला आहे, पलकला १९-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
01 Sep 2024 12:41 PM (IST)
भारताची युवा पॅरा बॅडमिंटन खेळाडू पलक कोहली इंडोनेशियाच्या खलिमतुस सादियाहविरुद्ध खेळत आहे, या सामन्यामध्ये तिने विजय मिळवल्यास तिचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा होईल.
01 Sep 2024 12:27 PM (IST)
फोटो सौजन्य - JIO Cinema
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू मनदीप कौर हीचा नायजेरियाच्या मरियम बोलाजीविरुद्ध सामना झाला. यामध्ये तिला ८-२१ ९-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिचे पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चे आव्हान संपुष्ठात आले आहे.
01 Sep 2024 12:13 PM (IST)
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू मनदीप कौर सध्या नायजेरियाच्या मरियम बोलाजीविरुद्ध खेळत आहे, यामध्ये तिला पहिल्या गेममध्ये ८-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
01 Sep 2024 12:05 PM (IST)
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू मनदीप कौर सध्या नायजेरियाच्या मरियम बोलाजीविरुद्ध खेळत आहे. या सामन्यांमध्ये तिने विजय मिळवल्यास ती सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.
01 Sep 2024 12:02 PM (IST)