फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : काही दिवसांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिकचे खेळ पार पडले. यामध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये भारताने ५ कांस्यपदक तर १ सिल्वर मेडलची कमाई केली होती. आता भारताचे पॅरा खेळाडू पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिकसाठी सज्ज झाले आहेत. यंदा भारताचे ८४ पॅरा खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. टोकियो पॅरालिम्पिक भारताच्या पॅरा खेळाडूंनी १९ पदक नावावर केले होते. त्यामुळे यंदा भारताच्या खेळाडूंकडून जास्त पदकांची भारतीय प्रेक्षकांना अपेक्षा आहे. २८ ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ रोजी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे ध्वजवाहक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुमित आंतील आणि भाग्यश्री जाधव हे असणार आहेत.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा सुरु असणार आहे. ११ दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ २८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JIO Cinema वर थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पॅरालिम्पिक युट्युब चॅनेलवर सुद्धा या स्पर्धेचे सामने पाहू शकतात. त्याचबरोबर टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी बीबीसी चॅनेलवर हे खेळ दाखवले जाणार आहेत.
खेळ | महिला | पुरुष | एकूण |
आर्चरी | 3 | 3 | 6 |
ॲथलेटिक्स | 28 | 10 | 38 |
बॅडमिंटन | 7 | 6 | 13 |
सायकलिंग | 1 | 1 | 2 |
जुडो | 1 | 1 | 2 |
पॅराकॅनोइंग | 1 | 2 | 3 |
पॉवरलिफ्टिंग | 2 | 2 | 4 |
रोईंग | 1 | 1 | 2 |
शूटिंग | 7 | 3 | 10 |
स्विमिंग | 1 | 0 | 1 |
टेबल टेनिस | 0 | 2 | 2 |
टायकान्डो | 0 | 1 | 1 |
एकूण | 52 | 32 | 84 |