पॅट कमीन्स(फोटो-सोशल मीडिया)
Pat Cummins Create History 2025 : जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ही मालिका वेस्ट इंडिजमध्ये खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना बार्बाडोसमध्ये खेळवला जात आहे. या दरम्यान, दोन्ही संघांकडून आश्चर्यकारक गोलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळत आहे. आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ संपला असून गोलंदाजांनी एकूण २४ विकेट्स काढल्या आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार विक्रम केला आहे.
एकूणच, दोन्ही संघ दोन दिवसांच्या खेळात प्रत्येकी एकदा सर्वबाद झाले आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, वेस्ट इंडिजचा संघ १९० धावांवर ऑलआउट झाला होता. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने २ विकेट्स मिळवून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या देशासाठी इतिहास रचला आहे.
हेही वाचा : क्रिकेट मैदानावर आता पंचांचा बोलबाला! ICC कडून स्लो ओव्हर रेटचा सामना करण्यासाठी ‘हा’ नियम जारी..
बार्बाडोसमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन विकेट्स घेतल्या आहेत. या दोन विकेट्ससह, कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा कर्णधार बनलाया आहे. या दरम्यान, त्याने माजी दिग्गज रिची बेनॉडला माग सोडले आहे. कर्णधार म्हणून रिचीने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १३८ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याच वेळी, पॅट कमिन्सने आता कसोटी स्वरूपात कर्णधार म्हणून १३९ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे.
याशिवाय, बार्बाडोस कसोटी दरम्यान पॅट कमिन्सने आपल्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्याबाबत जगातील दुसरा गोलंदाज बनला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर माजी दिग्गज पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान विराजमान आहे. त्याने पाकिस्तानचे नेतृत्व करताना एकूण १८७ कसोटी विकेट्स मिळवल्या आहेत.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, वेस्ट इंडिजने १९० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजसाठी पहिल्या डावात शाई होपने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ४८ धावांची खेळी खेळली आहे. त्याच वेळी, कर्णधार रोस्टन चेसने ४४ धावा आणि अल्जारी जोसेफने शेवटी नाबाद २३ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूप वाईट झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने आपले टॉपचे ४ फलंदाज गमावले. यादरम्यान सॅम कॉन्स्टास ५ धावा, उस्मान ख्वाजा १५ धावा, कॅमेरॉन ग्रीन १५ धावा आणि जोश इंग्लिश १२ धावा काढून माघारी परतले.






