Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

Badminton: सोळाव्या मानांकित निश्चल चंदला मात्र शौर्य अगरवालकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. तब्बल १ तास १२ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यात निश्चलने २२-२०, १५-२१, २१-१२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2026 | 08:30 PM
pune badminton competition

pune badminton competition

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापौर करंडकात देव, प्रणव, निश्चल, जगशेर उपांत्य फेरीत
  • गाथा सूर्यवंशी, इशिता नेगी, थायलंडच्या पट्टनून थियानापरपोर्नचोकचीही आगेकूच
  • युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत केला प्रवेश
पुणे/ Badminton: सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली सुरू असलेल्या या १९ वर्षांखालील स्पर्धेच्या मुलांच्या एकेरीत देव रुपारेलिया, प्रणव मंजुनाथ, निश्चल चंद आणि जगशेर सिंग खंगुर्रा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

मुलींच्या एकेरीत ऋषिका नंदी, गाथा सूर्यवंशी आणि इशिता नेगी यांनी उपांत्य फेरी गाठली, तर थायलंडच्या पट्टनून थियानापरपोर्नचोकनेही आगेकूच केली. पी.ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित देव रुपारेलियाने वीरेन सेठचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात देवने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सामन्यावर नियंत्रण ठेवले.सातव्या मानांकित प्रणव मंजुनाथने लक्ष्मी स्वेतन तमातमालाचे आव्हान २१-१४, २१-१७ असे परतवून लावले. अवघ्या २५ मिनिटांत संपलेल्या या सामन्यात प्रणवने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले

सोळाव्या मानांकित निश्चल चंदला मात्र शौर्य अगरवालकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. तब्बल १ तास १२ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यात निश्चलने २२-२०, १५-२१, २१-१२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.दुसऱ्या मानांकित जगशेर सिंग खंगुर्राने काल अव्वल मानांकित खेळाडूला पराभूत करून धक्कादायक निकाल नोंदविणाऱ्या अर्जुन रेड्डी अलुगुवेल्लीचा २१-११,  २१-१४ असा पराभव केला. ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात जगशेरने दोन्ही गेममध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

ऋषिका नंदीचा सनसनाटी विजय

मुलींच्या एकेरीत बिगर मानांकित ऋषिका नंदीने तिसऱ्या मानांकित दिशा संतोषचा २१-१६, २१-१८ असा पराभव करत स्पर्धेतील सनसनाटी निकाल नोंदवला. ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात ऋषिकाने संयमी तसेच आक्रमक खेळाचा सुरेख मेळ साधत मानांकित प्रतिस्पर्ध्यावर मात केली.थायलंडच्या पट्टनून थियानापरपोर्नचोकने भारताच्या विजया लक्ष्मी बोड्डूचे आव्हान २१-१७, २१-१७ असे संपुष्टात आणले. ३० मिनिटे चाललेल्या सामन्यात थायलंडच्या खेळाडूने दोन्ही गेममध्ये सातत्य राखत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

गाथा सूर्यवंशीने अवनी गोविंदचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. ३४ मिनिटांच्या या सामन्यात गाथाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत दोन्ही गेमवर पकड ठेवली आणि उपांत्य फेरी गाठली.दुसऱ्या मानांकित इशिता नेगीने धिष्ठा सिंघा गोपीनाथचा २२-२०, २१-१४ असा पराभव करत आपले आव्हान कायम राखले. पहिल्या गेममध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीनंतर इशिताने दुसऱ्या गेममध्ये आपल्या खेळाची गती वाढवत सामना जिंकला आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.

Web Title: Pranav manjunath enters semi finals of pune mayors cup international grand prix badminton tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Badminton
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
1

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना
2

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार
3

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा
4

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.