फोटो सौजन्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी युट्युब
पॅरिस पॅरालिम्पिक : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 29 पदकांची कमाई केली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौम्य आणि 13 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या पॅरा खेळाडूंना भेटले. यावेळी भारताच्या पॅरा खेळाडूंनी नरेंद्र मोदींना अनेक भेटवस्तु दिल्या. या खास प्रसंगी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दिल्लीचा पॅरा ॲथलीट आणि भालाफेक सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगसोबत पंतप्रधानांची भेट खूपच अनोखी होती, ज्यामध्ये पंतप्रधान नवदीपसोबत थट्टा करताना दिसले. याचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, सध्या व्हिडीयो व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटवर शेअर व्हिडीयोमध्ये भारताचा पॅरा अॅथेलेटिक्स नवदीप सिंग नरेंद्र मोदींना कॅप द्यायला येतो. कॅप घालण्यासाठी पंतप्रधान स्वत: जमिनीवर बसले जेणेकरून नवदीपला कॅप आरामात घालता येईल. हा भावनिक क्षण पाहून सर्वांचचं ह्रदय पिळवटल. यानंतर नवदीपने पंतप्रधानांना त्यांच्या फेकलेल्या हातावर ऑटोग्राफ मागितला, जो पीएम मोदींनी हसतमुखाने दिला.
भेटीदरम्यान पीएम मोदींनी नवदीपला गंमतीने विचारले, ‘तुला एवढा राग का येतो?’ आणि म्हणाले की, स्वत: चा व्हिडीयो पाहिला का? यावर नवदीपने हसून उत्तर दिले की, मी देशासाठी पदक जिंकण्याचे वचन दिले होते आणि आता ते वचन पूर्ण करून परतलो आहे.
12 संप्टेबर रोजी भारताच्या सर्व खेळाडुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचबरोबर संवाद देखील साधला. या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीयो अजुनपर्यत प्रदर्शित करण्यात आला नाही.