Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: मैदान गाजणार! बालभारतीचा मोठा निर्णय; चौथीच्या पुस्तकात थेट ‘ॲथलेटिक्स’चा समावेश

इयत्ता चौथी शारीरिक शिक्षण व निरायमयता या पुस्तकातील स्वयंमूल्यमापन विभागाद्वारे विद्यार्थी स्वतःची उंची, वजन, शारीरिक क्षमता आणि विविध कौशल्यांची नोंद ठेवू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची सवय विकसित होण्यास मदत होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 04:59 PM
Sports News: मैदान गाजणार! बालभारतीचा मोठा निर्णय; चौथीच्या पुस्तकात थेट 'ॲथलेटिक्स'चा समावेश

Sports News: मैदान गाजणार! बालभारतीचा मोठा निर्णय; चौथीच्या पुस्तकात थेट 'ॲथलेटिक्स'चा समावेश

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून मिळणार खेळाचे धडे
  • शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थी होणार धष्टपुष्ट
  • नव्या पाठ्यपुस्तकात व्यायाम, योग आणि स्वसंरक्षणाला प्राधान्य
सोनाजी गाढवे /पुणे: बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यात आली असून, इयत्त चौथी मधील ‘शारीरिक शिक्षण व निरामयता’ या पाठ्यपुस्तकात (Education) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर भर देण्यात आला आहे. खेळ, व्यायाम, योग, सूर्यनमस्कार, स्वसंरक्षण, निरामयता आणि क्रीडांगण विषयक सवयी यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली आहे.

पुस्तकात मूलभूत हालचाली, विविध व्यायाम, कवायत संचलन, शर्यती, लघुखेळ, पूरक खेळ, योगाभ्यास आणि सूर्यनमस्कार यांचा समावेश आहे. ए.बी.सी. ड्रिल्स, दिशाभिमुखता सराव आणि ॲथलेटिक्सची पूर्वतयारी यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, समन्वय, ताकद आणि लवचिकता विकसित होण्यास मदत होणार आहे. फुगडी, झिम्मा, एरोबिक्स आणि डान्सरसाईजसारख्या उपक्रमांमुळे व्यायाम अधिक आनंददायी करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना चांगला आणि वाईट स्पर्श ओळखणे, आत्मविश्वासाने ‘नको’ म्हणणे, धोकादायक परिस्थितीतून स्वतःची सुटका करणे आणि विश्वासू व्यक्तीला माहिती देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वसंरक्षणाच्या प्राथमिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या मुळे विद्यार्थी सर्तक होणार आहेत.

Mira Bhayandar News : शैक्षणिक वर्ष सुरू, पण अनधिकृत शाळांची माहिती अद्याप नाही; विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता

निरामयता विभागात संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग, पुरेशी विश्रांती, झोप, वैयक्तिक स्वच्छता आणि वाईट सवयींपासून दूर राहण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. क्रीडांगणाची स्वच्छता, योग्य पोशाख, क्रीडासाहित्याची निगा आणि प्रथमोपचार याबाबतही विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळणार आहे.

आत्मपरीक्षणाची सवय विकसित होणार

इयत्ता चौथी शारीरिक शिक्षण व निरायमयता या पुस्तकातील स्वयंमूल्यमापन विभागाद्वारे विद्यार्थी स्वतःची उंची, वजन, शारीरिक क्षमता आणि विविध कौशल्यांची नोंद ठेवू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची सवय विकसित होण्यास मदत होणार आहे.

चित्रांमधून व्यायामाचे धडे

‘शारीरिक शिक्षण व निरामयता’ या पाठ्यपुस्तकात कृतीयुक्त चित्रांच्या माध्यमातून विविध व्यायाम, खेळ, गतिरोध मालिका, मानवी मनोरे आणि हालचालींचे टप्पेवार मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कृती सहज समजून अचूकपणे सराव करता येणार असून शारीरिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. त्यातून विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

– नियमित व्यायाम व सूर्यनमस्कार करावेत.

– स्वच्छता, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य द्यावे.

– चांगला व वाईट स्पर्श ओळखून सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

– स्वयंमूल्यमापन करून शारीरिक प्रगतीची नोंद ठेवावी.

-योगाभ्यास मध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचे पालन करणे

-क्रीडांगणविषयक सवयी आणि स्वच्छता आणि खेळासाठी योग्य पोषाख गरजेचे आहे.

Merchant Navy Career: दहावी-बारावीनंतर कसा कराल प्रवेश? जाणून घ्या पात्रता, अभ्यासक्रम आणि संधी

शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना

– शारीरिक शिक्षणाचा तास इतर विषयांसाठी वापरू नये.

– विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

– विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नियोजन करावे.

– मैदान, साहित्य आणि प्रथमोपचाराची व्यवस्था उपलब्ध ठेवावी.

– विद्यार्थ्यांच्या सहभाग, शिस्त आणि क्रीडावृत्तीचे सातत्याने मूल्यमापन करावे.

-मुलाचे ज्ञान व आकलन तपासण्यासाठी इतर साधनांचा वापर करावा जसे अभिलेख व स्वयंमूल्यमापन

 

Web Title: Priority given exercise athletics yoga and self defense in new class 4 textbook balbharati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Education Department
  • School Students
  • Sports News

संबंधित बातम्या

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री
1

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!
2

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
3

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
4

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.