Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UEFA Champions League: PSG चॅम्पियन, पण पॅरिसमध्ये राडा! विजयाच्या उत्सवाला हिंसक वळण, पोलिसांची मोठी कारवाई, 400 अटकेत

Violence in Paris During Celebrations of PSG Champions league: PSG ने Arsenal F.C ला युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पराभूत केले. यानंतर पॅरिसमध्ये चाहत्यांनी जल्लोष केला मात्र या जल्लोषाला काही वेळातच हिंसक वळण लागले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 31, 2026 | 06:26 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • PSG चॅम्पियन, पण पॅरिसमध्ये राडा
  • विजयाच्या उत्सवाला हिंसक वळण
  • पोलिसांची मोठी कारवाई, 400 अटकेत
युरोपियन फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या युएफा UEFA चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना शनिवारी (दि.३०) बुडापेस्ट येथे पार पडला. अंतिम सामन्यात PSG ने Arsenal F.C. ला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत करून सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकले. पीएसजीच्या ऐतिहासिक विजयानंतर चाहत्यांनी पॅरिसमध्ये जल्लोष केला. मात्र या जल्लोषाला काही वेळातच हिंसक वळण लागले. यावेळी, रस्त्यांवर जाळपोळ, पोलिसांशी झटपट आणि तोडफोडीच्या घटना घडल्याने संपूर्ण फ्रान्स हादरला. यामध्ये सात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. ज्यानंतर पोलिसांनी देशभरातून ४०० हून अधिक लोकांना अटक केली.

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार! विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

हिंसाचाराने घेतले गंभीर रूप

बुडापेस्टमध्ये , १-१ अशा बरोबरीनंतर एका रोमांचक शूटआऊटमध्ये PSG ने आर्सेनलला ४-३ ने हरवून UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली. मात्र, या विजयानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आगीच्या ज्वाला भडकल्या. संपूर्ण शहर धुराने व्यापले होते. जल्लोषामुळे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष पेटला. शहरभर आगी लावण्यात आल्या आणि अनेकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, PSG च्या विजयानंतर सुमारे २०,००० समर्थक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पॅरिस रिंग रोडवर वाहतूक कोंडी केली , दुकाने फोडली, वाहनांना आग लावली आणि पोलिसांवर फटाके फेकले आणि सहा वाहनांचे नुकसान केले.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला. या घटनांमध्ये अनेक पोलिस जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

काही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, चॅम्प्स एलिसीवर (Champs Elysees) चाहते फटाके फोडताना, फ्लेअर्स पेटवताना आणि मोठ्या संख्येने जमलेले दिसत होते. काही भागांमध्ये जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तर पार्क डेस प्रिन्सेस (Parc des Princes) आणि शहराच्या इतर भागांमध्येही किरकोळ चकमकी झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजेपर्यंत, पॅरिस पोलिसांनी १३० हून अधिक लोकांना अटक केली होती. अंतिम सामना पाहण्यासाठी पॅरिसभर हजारो पीएसजी चाहते जमले होते, तर पार्क डे प्रिन्सेस स्टेडियममध्ये ४०,००० हून अधिक समर्थक खचाखच भरले होते, जिथे मोठ्या पडद्यांवर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

 ४०० पेक्षा अधिक जण ताब्यात

फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातून ७०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली असून ४०० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात अटक पॅरिसमध्ये झाली. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हजारो पोलिस तैनात करण्यात आले होते.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पॅरिसमधील हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. रस्त्यावर जळणाऱ्या गाड्या, धूर आणि पोलिसांशी झटापट यामुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षीही PSG च्या विजयानंतर अशाच प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला होता.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या सामन्यासाठी फ्रान्समध्ये हजारो पोलिस तैनात करण्यात आले होते. तरीही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढील काही दिवस पॅरिसमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा; प्रवासाला विलंब; अवघे काही तास आधी टायटन्स अहमदाबादमध्ये दाखल

Web Title: Psg champions league victory paris violence fans clash police 400 arrests marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Football Match
  • Football Tournament
  • France

संबंधित बातम्या

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य
1

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य

LouvreThef :१०२ दशलक्ष डॉलर्सच्या चोरीनंतर लूव्रने ‘अपोलो गॅलरी’ पुन्हा खुली केली; राजघराण्यातील मौल्यवान रत्ने प्रदर्शनात नाहीत.
2

LouvreThef :१०२ दशलक्ष डॉलर्सच्या चोरीनंतर लूव्रने ‘अपोलो गॅलरी’ पुन्हा खुली केली; राजघराण्यातील मौल्यवान रत्ने प्रदर्शनात नाहीत.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.