लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल(फोटो-सोशल मीडिया)
The Hundred : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाने जेतेपद जिंकले. यावर्षी आरसीबी संघाचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. त्याचे कारण आता पहिले आयपीएलचे विजेतपद जिंकणाऱ्या आरसीबी संघातील खेळाडू इतर स्पर्धांमध्ये आपला डंका वाजवत आहेत. द हंड्रेडमध्ये हे खेळाडू आपले वर्चस्व गाजवतान दिसत आहे. या स्पर्धेमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन आणि २१ वर्षीय जेकब बेथेल यांनी धुमाकूळ घातला आहे. या दोघांनी मिळून १३ चेंडूचा सामना करत विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ५० धावा काढल्या आहेत. या खेळीने १३६ वर्षांचा विक्रम मोडीत काढत जेकब बेथेलने इंग्लंडचा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाने आपले पहिले आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आरसीबीच्या विजयात चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आता इतर स्पर्धांमध्ये देखील चमकत आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन द हंड्रेडच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तर आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जेकब बेथेलची इंग्लंडच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. १७ ऑगस्ट रोजी द हंड्रेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात लंडन स्पिरिटविरुद्ध बेथेल आणि लिव्हिंस्टोन या दोघांच्या खेळीमुळे बर्मिंगहॅम फिनिक्सने ३५ चेंडू राखून सामना आपल्या खिशात टाकली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पिरिटने १०० चेंडूत ६ विकेटसाठी १२६ धावा केल्या. या ६ विकेटपैकी २ विकेट लियाम लिव्हिंगस्टोने काढल्या आहेत. त्यानंतर १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्मिंगहॅम फिनिक्स फलंदाजीसाठी उतरला, बर्मिंगहॅम फिनिक्स ने क्लार्कच्या वादळी अर्धशतक आणि नंतर लिव्हिंगस्टोन आणि बेथेलच्या स्फोटक खेळी करून रचेलेल्या भागीदारीमुळे केवळ १२७ धावांचे लक्ष्य ६५ चेंडूत पूर्ण केले.
लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल दोघेही शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. दोघांमध्ये २५ चेंडूत ६३ धावांची स्फोटक भागीदारी रचली. त्यापैकी ५० धावा या फक्त १३ चेंडूत आल्या. यामध्ये दोन्ही फलंदाजांनी ६ षटकार आणि १ चौकार लगावला.
हेही वाचा : UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral
लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल यांनी २२५-२२५ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या. लिव्हिंगस्टोनने २० चेंडूत ४५ धावा काढल्या, ज्यामध्ये १ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, जेकब बेथेलने ८ चेंडूत २ षटकारांसह १८ धावा फटकावल्या. बर्मिंगहॅम फिनिक्सने ३ विकेट गमावून सामना सहज जिंकला. द हंड्रेडमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांमधील हा त्यांचा दुसरा विजय ठरला.