Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB: आता लक्ष्य फक्त फायनलचं! RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार? प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?

RCB IPL Playoffs Records: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफसाठी आपले स्थान निश्तिच केले आहे. त्यामुळे RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार का अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 08:26 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार?
  • प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?
  • IPL 2026 मध्ये RCB ची दमदार कामगिरी
आयपीएल २०२६ चा लीग टप्पा संपला असून आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष प्लेऑफ सामन्यांकडे लागले आहे. या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना २६ मे रोजी धर्मशाळा येथील एचपीसीए (HPCA) स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांनी लीग टप्प्यात दमदार कामगिरी करत गुणतालिकेतील अव्वल दोन स्थानं पटकावली आहेत. अशा परिस्थितीत, आरसीबीच्या आतापर्यंतच्या प्लेऑफ इतिहासाकडे काय सांगतो, जाणून घेऊयात.

IPL 2026: फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने; पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

IPL प्लेऑफमध्ये RCB ची आतापर्यंतची कामगिरी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने आयपीएल इतिहासात आतापर्यंत ११ वेळा प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. प्लेऑफमध्ये संघाने एकूण १७ सामने खेळले असून त्यापैकी ७ सामने जिंकले, तर १० सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. RCB ने आतापर्यंत चार वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०११ पासून आयपीएलमध्ये प्लेऑफ फॉरमॅट सुरू करण्यात आला. त्यानंतर, बंगळुरुने एकूण ३ वेळा क्वालिफायर-१, ३ वेळा क्वालिफायर-२ आणि ५ वेळा एलिमिनेटर सामने खेळले आहेत.

क्वालिफायर १ मध्ये आरसीबीची कामगिरी

बंगळुरुने आयपीएल इतिहासात आतापर्यंत तीन वेळा क्वालिफायर-१ मध्ये स्थान मिळवले आहे. त्यापैकी २ सामने जिंकले असून एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०११ मध्ये आरसीबीने प्रथमच क्वालिफायर-१ मध्ये प्रवेश केला होता. मात्र, या सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून पराभव पत्करावा लागला. यानंतर २०१६ च्या हंगामात आरसीबीने गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवत पुन्हा क्वालिफायर-१ साठी पात्रता मिळवली. त्या वेळी संघाने शानदार प्रदर्शन करत गुजरात लायन्सचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने तिसऱ्यांदा क्वालिफायर-१ खेळला.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने पंजाब किंग्सवर मात करत फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. क्वालिफायर-२ मध्ये आरसीबीला तीनपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला, तर दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. तसेच, आरसीबीने चार फायनल सामने खेळले असून त्यापैकी फक्त एकदाच विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, गेल्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने आपले पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले होते.

IPL 2026 मध्ये RCB ची दमदार कामगिरी

या हंगामात RCB ने दमदार प्रदर्शन करत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संघाने १४ पैकी ९ सामने जिंकले, तर ५ सामन्यांत पराभव पत्करला. १८ गुणांसह आरसीबीने पहिल्या स्थानावर कब्जा केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचेही १८ गुण होते, मात्र नेट रनरेटमध्ये आरसीबीने दोन्ही संघांना मागे टाकले. गतविजेते आरसीबी आता आणखी एका अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. संघाची सध्याची फॉर्म आणि प्लेऑफमधील अनुभव पाहता, यंदाही आरसीबी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.

IPL 2026: प्लेऑफचा थरार वाढला; ऑरेंज-पर्पल कॅपची चुरस शिगेला, खेळांडूमध्ये कांटे की टक्कर

Web Title: Rcb playoff record ipl 2026 qualifier 1 vs gujarat titans cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
1

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.