RCB Vs RR Pitch Report (फोटो- ians)
वैभव सूर्यवंशी विरुद्ध भुवनेश्वर कुमार आमनेसामने
आरसीबी अन् आरआर भिडणार
गुवाहाटी येथे 7.30 वाजता सुरू होणार सामना
RCB Vs RR Tata IPL 2026 Updates: आजचा आयपीएलचा सामना अत्यंत खास असणार आहे. आपले पहिले सगळे सामने जिंकेलेले दोन संघ आज एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB Vs RR) यांच्यात आज संध्याकाळी 7.30 वाजता गुवाहाटी येथे थरार रंगणार आहे. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्टबद्दल जाणून घेऊयात.
आज विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी यांची फलंदाजी पाहायला मिळणार आहे. तसेच भुवनेश्वर कुमार विरुद्ध वैभव सूर्यवंशी यांचा सामना रंगतदार असणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 14 सामने राजस्थान रॉयल्स आणि 17 सामने बंगलोरच्या संघाने जिंकले आहेत. 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.
वैभव सूर्यवंशीवर असणार लक्ष
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने तडाखेबंद खेळी केली. दरम्यान सध्या वैभव सूर्यवंशी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आज विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Mukul Choudhary ने KKR ला विजयाच्या उंबरठ्यावरच रोखलं; LSG ने केला 3 विकेट्सने दारुण पराभव
कशी असणार गुवाहाटीची खेळपट्टी?
गुवाहाटी स्टेडियमवर खेळपट्टी ही फलंदाजीसाठी उत्तम समजली जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात येथे धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकते. दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ होते. त्यामुळे येथे फलंदाजी करणे थोडे कठीण जाते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणे योग्य ठरू शकते.
कसे असणार हवामान?
आज येथील हवामान स्वच्छ आणि मोकळे असण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास येथे हलक्या टे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पाऊस झाल्यास तयाचा सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे.
KKR Vs LSG Live: रहाणेची ‘अजिंक्य’ खेळी; ऋषभ पंतच्या एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, अभिनंदन सिंग, जितेश शर्मा, शशांक सिंग
आरआरची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर.






