भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतचा (Rishabh Pant Accident) शुक्रवारी सकाळी अपघात झाला. तो कारने उत्तराखंडला जात होते.3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 क्रिकेट संघात निवड न झाल्याने ऋषभ पंत दिल्लीहून धांडेरा रुरकी येथील त्याच्या घरी परतत होता. मात्र धुक्यामुळे गाडी त्याला रेलिंग दिसत नसल्याने हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे.
[read_also content=”कधी भांडी घासली, कधी मजुरी, कधी सूत कातणं, मुलांच्या शिक्षणासाठी सदैव झटत राहिल्या हिराबेन मोदी! https://www.navarashtra.com/india/life-story-of-narendra-modi-mother-heeraben-modi-nrpc-357969.html”]
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र ऋषभ पंतला या दोन्ही मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने त्याला वगळण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र, यामुळे पंतबाबत फॅन्सना अनेक प्रकारचे प्रश्न पडले आहेत.
[read_also content=”कधी भांडी घासली, कधी मजुरी, कधी सूत कातणं, मुलांच्या शिक्षणासाठी सदैव झटत राहिल्या हिराबेन मोदी! https://www.navarashtra.com/india/life-story-of-narendra-modi-mother-heeraben-modi-nrpc-357969.html”]
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने भारतीय क्रिकेट संघात शानदार एन्ट्री केली आहे. त्याच्या स्फोटक आणि विलक्षण फलंदाजीने तो येताच लक्ष वेधून घेतले आणि काही वेळातच त्याला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. कारण धोनीप्रमाणेच पंतनेही विकेटमागे आपल्या चपळाईने सामना पूर्ण करण्यात महारत मिळवली होती. मात्र, 2022 मध्ये त्याची कामगिरी काही खास नव्हती. वर्षाच्या अखेरीस बांगलादेश दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेतून त्याला वगळण्यात आले होते. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत तो भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक खेळू शकेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०२३ च्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे.
ऋषभ पंतची 2022 सालातील कामगिरी पाहिली तर, तो टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कसोटीत सरस ठरला आहे.खेळावर नजर टाकली तर तो भारतासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये दिसला, ज्यामध्ये तो 37.33 च्या सरासरीने केवळ 336 धावा करू शकला. दुसरीकडे, पंत या वर्षी टीम इंडियासाठी 25 टी-20 सामन्यांमध्ये 21.41 च्या सरासरीने केवळ 364 धावा करू शकला आहे. अशा स्थितीत त्याला श्रीलंकेविरुद्ध संघातून वगळण्यात आले असेल, तर त्याची खराब कामगिरी हे त्याचे कारण आहे, हे निश्चित.