फोटो सौजन्य - JioHotstar
रिषभ पंतचा व्हिडीओ : एकना क्रिकेट स्टेडियमवर काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांनी काल संथ गतीने फलंदाजी केली त्यामुळे मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला. पहिले फलंदाजी करत लखनौच्या संघाने दिल्ली कॅपिटल्ससमोर ६ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २ विकेट गमावून १७.२ ओव्हरममध्ये लक्ष्य पूर्ण केले. कालच्या सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाकडून अभिषेक पोरेल आणि केएल राहुल या दोघांनी अर्धशतकीय खेळी खेळली. कालच्या सामन्यांमध्ये रिषभ पंत संतापलेला दिसला त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऋषभ पंतचा खराब फॉर्म आणि त्याचबरोबर त्याची कॅप्टन्सी देखील फार काही चांगली राहिली नाही. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुन्हा एकदा पंत फलंदाजीत अपयशी ठरला, ज्यामुळे एलएसजीला घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कालच्या सामन्यांमध्ये तो खूप नंतर म्हणजेच अगदी पहिला डाव शिल्लक असताना शेवटचे दोन चेंडू खेळण्यासाठी तो मैदानात आला. सामन्यातील पराभवाव्यतिरिक्त, पंतने मैदानाच्या मध्यभागी असे काहीतरी केले, ज्यामुळे त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A fun banter between DIGVESH RATHI and Rishabh Pant related to KL Rahul’s LBW decision!
📸: JioHotstar#IPL2025 #LSGvsDC #DigveshRathi #RishabhPant #CricketTwitter pic.twitter.com/4F28QoTokx
— InsideSport (@InsideSportIND) April 22, 2025
तुम्हाला सांगतो की लाईव्ह सामन्यात पंतने रागाच्या भरात त्याच्या एका गोलंदाजाला कानशिलात मारली. खरंतर, लखनौ आणि दिल्ली यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीवर राग व्यक्त केला. डावातील ७ वे षटक खेळत असताना ही घटना घडली. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, दिग्वेशने ऑफ स्टंपवर केएल राहुलला एक पूर्ण लांबीचा चेंडू टाकला, जो वळण घेऊन त्याच्या पुढच्या पॅडवर आदळला. पंत यष्टीच्या मागे उभा होता आणि गोलंदाजाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले. तथापि, पंचांनी तो नॉट आउट दिला.
म्हातारा वेडा झाला का…? PSL समारंभात रमीझ राजाने केला IPL चा उल्लेख, नक्की प्रकरण काय…
पंतनेही डीआरएस घेण्यास रस दाखवला नाही, परंतु दिग्वेशच्या सल्ल्यानुसार पंतने डीआरएस घेतला आणि पुनरावलोकनात असे दिसून आले की पंचांचा नॉट आउटचा निर्णय योग्य होता. यादरम्यान, स्क्रीनवर ‘नॉट आउट’ असे शब्द येताच पंतने रागाने दिग्वेशला थप्पड मारण्यास सुरुवात केली. लखनौने १४ षटकांत ४ बाद ११० धावा केल्या होत्या. मार्श बाद झाल्यानंतर, ऋषभ पंत क्रीजवर येणे निश्चित मानले जात होते, परंतु प्रशिक्षक आणि मार्गदर्शकाने फॉर्ममध्ये नसलेल्या कर्णधार आयुष बदोनीला पुढे पाठवले. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही बदोनीने चांगली फलंदाजी केली.